शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

वर्ध्यात १७७ 'आपले सरकार सेवा केंद्रा'ला लावले टाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 5:20 PM

कामात अनियमितता भोवली : एकही ट्रान्झेक्शन न झालेल्या आयडी केल्या बंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वसामान्यांना विविध दाखल्यांकरिता तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत; त्यांचा वेळ आणि पैसा वाचावा आणि गावागावांतच सेवा उपलब्ध व्हावी, याकरिता शासनाने 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू केले होते; परंतु काही केंद्र संचालकांनी या सेवेला हरताळ फासून दुकानदारी चालविल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाने तपासणी मोहीम आरंभली. तपासणीअंती अनियमितता आढळून आल्याने तिन्ही उपविभागांतील एकूण १७७ 'आपले सरकार सेवा केंद्रां'चे परवाने रद्द करून त्यांना कायमचे टाळे ठोकले आहेत.

जिल्ह्यातील तिन्ही उपविभागांतील आठही तालुक्यांमध्ये शासनाकडून टप्प्याटप्प्यांत ८३० आपले सरकार सेवा केंद्रे सुरू केली होती. या केंद्रांतून विविध प्रमाणपत्रे व दाखले उपलब्ध करून दिले जातात. विशेषतः कोणत्या दाखल्याकरिता किती कालावधी व किती रक्कम आकारली जावी, याचीही नियमावली शासनाकडून ठरवून दिली होती; परंतु बहुतांश आपले सरकार सेवा केंद्र संचालकांनी या केंद्रांच्या माध्यमातून आपली दुकानदारी चालविली होती. अवाच्या सव्वा शुल्क आकारणे, तसेच नियमबाह्य प्रमाणपत्र देण्याचे प्रकारही जिल्ह्यात उघडकीस आले. गेल्यावर्षी या गंभीर बाबी चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तिन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सूचना करून तपासणी करण्यात आली. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र संचालकांची सुनावणी घेतली. त्यानंतर १७७ केंद्रांचे परवाने रद्द केले.

गरिबांचा वेळ, पैसा वाचण्यासाठी निर्मितीशासनाने जवळपास प्रशासनाच्या सर्व सुविधा ऑनलाइन केली आहे. यात जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासह लहान-मोठ्या कामासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व कागदपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज राहिली नाही. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होते आहे.

या सुविधा देणे अपेक्षितआपले सेवा केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांना उत्पन्नाचा दाखला, अधिवास, शपथपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र, अकृषक परवाना, वारस प्रमाणपत्र, वंशावळ प्रमाणत्र देणे अपेक्षित आहे.

तालुकानिहाय केंद्रउपविभाग                           केंद्रांची संख्या वर्धा                                           ७४आर्वी                                          २८हिंगणघाट                                    ७५

रद्द केलेले परवानेतालुका                      केंद्र                      रद्द केलेले केंद्रआर्वी                            ७९                              १३आष्टी                            ४९                              ०२कारंजा                         ५२                               १३देवळी                         १०६                              १७सेलू                             १०१                              २७वर्धा                             १९८                             ३०हिंगणघाट                     १४३                             ३४समुद्रपूर                       १०२                             ४१

"जिल्ह्यात ज्या आपले सरकार केंद्र संचालकांनी आयडी घेतल्यापासून एकही ट्रान्झेक्शन केलेले नाही अशा १७७ केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आलेआहेत. यामुळे नवीन केंद्र संचालकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे."- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.

आयडी घेतल्यापासून एकही ट्रॅन्झक्शन नाही; परवाना रद्दआयडी घेतल्यापासून एकही ट्रान्झेक्शन नाही गावातील नागरिकांना प्रशाकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने ८३० केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, यातील तब्बल १७७ आपले सेवा केंद्राच्या आयडीवरून एकही ट्रान्झेक्शन झाले नसल्याने या आयडी बंद करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :wardha-acवर्धा