लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ व सुंदर शहर या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील पाच ठिकाणी ‘नम्मा टॉयलेट’ लावण्याचे काम स्थानिक नगर परिषदेने हाती घेतले. तिन ठिकाणी नम्मा टॉयलेट लावण्याचे काम पूर्ण झाले असले तरी पालिका प्रशासनाला त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त सापडत नसल्याचेच दिसून येते. विशेष म्हणजे, बसविण्यात आलेल्या तीन पैकी एका नम्मा टॉयलेट बाबतचे प्रकरण विविध आरोप झाल्याने न्यायप्रविष्ठ आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०१८ हा उपक्रम हाती घेवून पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांनी रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाºया बेशिस्तांना पालिकेच्या कचरापेटीत कचरा टाकण्याची शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना उघड्यावर लघुशंकेसह प्रात:विधीसाठी लावे लागू नये म्हणून शहरातील पाच ठिकाणी नम्मा टॉयलेट लावण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी ६०.१९ लाखांचा निधीही उपलब्ध झाला. मात्र, जानेवारी २०१८ मध्ये कंत्राटदाराने वर्धा न.प.ला अदा करावयाची एकूण कामाच्या २ टक्के रक्कम न भरल्याने नम्मा टॉयलेट यंदाच्या वर्षीतरी शहरात लावण्यात येईल काय यासह विविध चर्चेला उधाण आले होते. त्यानंतरच्या काळात कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाल्याने सदर उलट-सुलट चर्चेला अर्धविराम मिळाला होता. तिन ठिकाणी नम्मा टॉयलेट बसविण्याचे काम पूर्ण होऊनही सध्यास्थितीत ते कुलूपबंदच असल्याने पुन्हा आता उलट-सुटल चर्चेला उधाण आले आहे. वर्धेकरांना व जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरात विविध कामानिमित्त येणाºयांना योग्य सोयी-सुविधा मिळाव्या या हेतूने पालिका प्रशासनासह तेथील लोकप्रतिनिधींनी काम पूर्ण झालेल्या तिनही नम्मा टॉयलेट नागरिकांच्या सुविधेसाठी खुले करावे, अशी मागणी आहे.दोन ठिकाणांना नम्माची प्रतीक्षारेल्वे स्थानक मार्ग, बस स्थानक शेजारी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नम्मा टॉयलेट बसविण्यात आले. परंतु, आर्वी नाका परिसर व बडे चौक या ठिकाणांवर नम्मा टॉयलेट लावण्यात आले नसल्याने नागरिकांना तेथे सदर टॉयलेट बसविण्याची प्रतीक्षा आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.बसस्थानकाशेजारच्या नम्माचे प्रकरण न्यायालयातवर्धा शहरातील बस स्थानका शेजारी नम्मा टॉयलेटचे बांधकाम पूर्ण झाले; पण ज्या ठिकाणी नम्मा टॉयलेट बांधण्यात आले. त्या जागेवर काही छोटे व्यावसायिक गत अनेक वर्षांपासून हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्री करतात. याच व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली.पाच ठिकाणची निवडशहरातील वर्धा रेल्वे स्थानक मार्ग, बस स्थानकाशेजारी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, आर्वी नाका परिसर, तसेच बडे चौक या ठिकाणांची नम्मा टॉयलेट लावण्यासाठी पालिका प्रशासनाच्यावतीने निवड करण्यात आली. त्यासाठी ६० लाख १९ हजार ८४० रुपयांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु, तीन ठिकाणी काम पूर्ण होऊनही नम्मा टॉयलेटच्या उद्घाटनासाठी पालिकेला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसते.जिल्हा कचेरीसमोरच नम्मा टॉयलेट शेजारी चालतो जुगारजिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा निधी खर्च करून नम्मा टॉयलेट बांधण्यात आले आहे. परंतु, ते सध्या कुलूपबंदच आहे. असे असले तरी याच नम्मा टॉयलेटच्या आवारात काही जुगारी दिवसभर ५२ पत्त्यांचा खेळ रंगवत असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर सदर जुगारी तेथे मोठ्या प्रमाणात पैशांची हार-जीतही करीत असल्याची चर्चा शहरात आहे. ज्या ठिकाणी हा जुगार सुरू असतो तेथून उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे, हे विशेष.
‘नम्मा’च्या उद्घाटनाला मुहूर्त सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 11:29 PM
स्वच्छ व सुंदर शहर या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून वर्धा शहरातील पाच ठिकाणी ‘नम्मा टॉयलेट’ लावण्याचे काम स्थानिक नगर परिषदेने हाती घेतले.
ठळक मुद्दे६०.१९ लाखांचा खर्च : स्वच्छ व सुंदर शहराच्या उद्देशाला खो