लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील विविधा केंद्रातून विद्यार्थी व पालक तसेच शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे अनेक कागदपत्रे दिल्या जातात. सदर कार्यालयात कंत्राटीपद्धतीने काही तरुण विविध कामांसाठी कार्यरत आहेत; पण कंत्राटदाराच्या कंत्राटाचा करार नुकताच संपल्याने तेथील कर्मचाºयांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. शुक्रवारी अधिकारच नसल्याने एकाही कर्मचाºयांने कामाला हाथ लावला नाही. त्यामुळे विविध कामानिमित्त येणाºयांना नाहक त्रास सहन करावा लागला.विविधा केंद्रातील कंत्राटीपद्धतीने काम करणाºया तरुणांना कंत्राटदाराकडून अतिशय अल्प मोबदला दिला जातो. अल्प मोबदला मिळत असला तरी अनेक तरुण येथे काम करून आपल्या कुटुंबियांना सहकार्य करतात. या कार्यालयातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या देखरेखीत चालते. येथे विविध कामासाठी मनुष्यबळ पुरविण्यासाठी वेळोवेळी कंत्राट काढून तरुणांची भरती केली जाते. सध्या कंत्राटीपद्धतीने सेवा देणारे सुमारे ३५ तरुण कार्यरत आहेत. त्यात एका तरुणीचा समावेश आहे. परंतु, मनुष्यबळ पुरविण्याचा कंत्राट २६ आॅक्टोबरला संपल्याने व तशी माहिती संबंधीताने विविधा केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना सांगण्यात आली. सदर वार्ता कर्मचाºयांना माहिती होताच आपल्याला काम करण्याचा अधिकारच नाही त्यामुळे आपण नागरिकांची कामे कशी करावी असे कारण पुढे करीत नवीन कंत्राटदाराने आम्हाला कामावर सामावून घ्यावे अशी मागणी करीत शुक्रवारी कामाला हाथ लावला नाही. पूर्वी कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना नव्या कंत्राटदाराने कामावर सामावून घ्यावे, या मागणीचे निवेदन विविधामधील कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकाºयांनी विविधामध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांच्या मागणीवर सकारात्क प्रतिसाद न दिल्याचा आरोप करीत अखेर शुक्रवारी सकाळपासून कर्मचाºयांनी कुठलेही काम करण्यास नकार दिला. त्यामुळे विविध प्रमाणपत्र व शपथपत्र तयार करण्याचे विविधा केंद्रातील कामकाज ठप्प झाले होते.एनएसपी ग्रामदूत कर्मचाºयांना कार्यरत कराएनएसपी फ्युचरटेक ग्रामसेतूमध्ये गत १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाºयांवर करार संपल्याने उपासमारीची वेळ आली आहे. सुमारे ३५ कर्मचाºयांवर बेरोजगारीचे सावट आहे. त्यांना तात्काळ नव्याने देण्यात येणाºया कंत्राटदाराने कामावर सामावून घ्यावे व यासाठी जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी निवेदनातून विविधामधील कर्मचाºयांनी केली आहे.रिकाम्या खुर्च्यां पाहून अनेक जण परतलेनवीन कंत्राटदाराने पूर्वीच्या कर्मचाºयांना कामावर सामावून घ्यावे व यासाठी जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी करावी, ही मुख्य मागणी रेटून लावण्यासाठी शुक्रवारी विविधामधील एकाही कर्मचाºयांने कामाला हात लावला नाही. विविधा केंद्रातील रिकाम्या खुर्चा शुक्रवारी दिवस भर कर्मचाºयांची प्रतीक्षाच करीत होत्या. विविध कामानिमित्त विविधा केंद्रात आलेल्या अनेकांना कर्मचारीच खुर्चीवर नसल्याने नाहक त्रास सहन करत आल्यापावली परत जावे लागले.
विविधातील कर्मचाºयांच्या अडचणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 1:01 AM
येथील विविधा केंद्रातून विद्यार्थी व पालक तसेच शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे अनेक कागदपत्रे दिल्या जातात.
ठळक मुद्देकरार संपला : शपथपत्रासह विविध कामे ठप्प;विद्यार्थी, पालक व शेतकºयांना नाहक त्रास