शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

ईपीएस १९९५ योजनेंतर्गत सेवानिवृत्ती धारकांच्या वेतनात वाढ करा

By admin | Published: September 14, 2016 12:38 AM

महागाईच्या काळात असंघटीत कामगारांना शासनाकडून तुटपुंजे वेतन मिळत आहे. त्यांना मिळणारे सेवानिवृत्ती वेतनही अत्यल्प आहे.

रामदास तडस यांची लोकसभेत मागणीपुलगाव : महागाईच्या काळात असंघटीत कामगारांना शासनाकडून तुटपुंजे वेतन मिळत आहे. त्यांना मिळणारे सेवानिवृत्ती वेतनही अत्यल्प आहे. त्यांचा सेवानिवृत्ती वेतनाचा प्रश्न सुटावा, यासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या भगतसिंह कोशियारी समितीच्या शिफारशी केंद्र शासनाने स्वीकारून या कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी खा. रामदास तडस यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्नान्वये केली आहे. आज सर्वच क्षेत्रातील शिक्षण महाग झाले आहे. लाखो रुपये खर्च करून शिक्षण घेतलेल्या अभियंता कामगार शिक्षक खासगी क्षेत्रात तुटपुंज्या वेतनावर वर्षांनुवर्षे काम करीत आहेत. अशा १८६ उद्योगातील लाखो असंघटीत कामगार सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. लाखो कामगार सेवानिवृत्तीनंतर अल्पशा निवृत्ती वेतना कुटुंबाचा गाडा रेटत आहे. या असंघटित कामगारांना व त्यांच्यावर निर्भर असणाऱ्या लाखो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न शासनापुढे उभा आहे. या प्रश्नांतर्गत त्यांनी वर्तमान काळात कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) ९५ अंतर्गत कामगार कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या सेवा निवृत्ती राशीमध्ये वृद्धी करण्याचा विचार आहे का? असल्यास त्याबाबत माहिती व कारणे काय आहेत. याबाबत शासनाकडून अंतिम माहिती घेण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न खा. तडस यांनी लोकसभेत प्रधानमंत्री व केंद्रीय श्रम व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ना. बंडारू दत्तात्रेय यांना केल्याची ‘लोकमत’शी बोलताना दिली. कोशियारी समितीच्या शिफारशी लागू करापुलगाव : अल्पवेतनावर काम करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा राहिल्यास त्याला किती सेवा निवृत्तीवेतन मिळेल. याचा विचार करणे गरजेचे असल्यामुळे आपण यापूर्वीही ८ डिसेंबर २०१४ रोजी नियम ३७७ अंतर्गत लोकसभेत प्रश्न उपस्थित करून भगतसिंह कोशियारी समितीच्या शिफारशी सेवानिवृत्ती धारकांना लागू करण्याची मागणी केली होती. असंघटित क्षेत्रातील सेवा निवृत्तीधारक कामगारांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.(तालुका प्रतिनिधी)