लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिण्यात पावसाने दडी मारली त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकºयाला जुलै अखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिण्यात सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. कपाशी व सोयाबीन पीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले असून त्याच्या निंदणाचा खर्च वाढत चालला आहे. प्रत्येक गावात महिला मजुरांना निंदण कामासाठी शेतकºयांना मॅनेज करावे लागत आहे. महिला मजुरांची मजुरी २०० रूपयाच्या वर गेली असून गावापासून शेतापर्यंत मजुरांच्या वाहतुकीचा खर्चही शेतकºयालाच करावा लागत आहे. महिला मजुरांची टंचाई असल्याने १० ते १५ महिलांचा जत्था तयार करून त्यांना शेती कामासाठी उपलब्ध करून देणाºया दलाल (मेट) याला प्रति महिला मजुरामागे २० ते ५० रूपये मिळत आहे.वर्धा जिल्ह्यात आठही तालुक्यात सोयाबीन ,कपाशी व तुर हे तीन पिक खरीपात घेतले जातात. यावर्षी सुरूवातील पावसामुळे लागवड उशिरा करण्यात आली. त्यात पावसाने जून महिण्यात दगा दिला. त्यानंतर जुलै महिण्यात पाऊस आला शेतकºयांना दिलासा मिळाला मात्र जुलैच्या मध्यापासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन व कपाशी या दोन्ही पिकांत तण वाढले आहे.तणाची काढणी (निंदन) करण्यासाठी खर्चही वाढत आहे. त्यामुळे महिला मजुरांना मोठी डिमांड निर्माण झाली आहे. सकाळी ८.३० वाजतापासून महिला मजूर शेती कामावर निघत आहे. पुर्वी गावातून पायी शेतापर्यंत मजूर जात होते. मात्र गेल्या दोन वर्षात मजुराच्या वाहतुकीसाठी आॅटो रिक्षा, मालवाहू वाहन आदीची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागत आहे. ३०० रूपये खर्च प्रति दिवस शेतकºयांवर बसत आहे. सायंकाळी ५.३० पर्यंत काम करण्यात येत असून २०० रूपये रोज महिला मजूरांना द्यावा लागत आहे. एकाच वेळी अनेक शेतकºयांचे निंदनाचे फेर आल्याने महिला मजुरांचे भाव वधारलेले आहे. काही भागात महिलांच्या गटाला घेवून दलाल (मेट) मजूर उपलब्ध करून देत आहे. या दलालाही कमिशन शेतकºयांलाच द्यावे लागत आहे. सध्या पाऊस समाधानकारक असल्याने शेतकरी सुखावला असला तरी निंदनाचा खर्च शेतीचा बजेट वाढविणारा आहे.
संततधार पावसामुळे शेतीच्या निंदन खर्चात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:02 AM
जून महिण्यात पावसाने दडी मारली त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकºयाला जुलै अखेर पावसाने दिलासा दिला. मात्र जुलै व आॅगस्ट महिण्यात सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. कपाशी व सोयाबीन पीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण निर्माण झाले असून त्याच्या निंदणाचा खर्च वाढत चालला आहे.
ठळक मुद्देमजुराच्या वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या माथी