शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

भुयारी गटार योजनेमुळे वाढली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 10:05 PM

शहरात मागील दोन-तीन महिन्यांपासून भुयारी गटार योजनेकरिता सुस्थितीतील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. या योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही आपने दिला आहे.

ठळक मुद्देकामाचा दर्जाही निकृष्ट : मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहरात मागील दोन-तीन महिन्यांपासून भुयारी गटार योजनेकरिता सुस्थितीतील रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता बळावली आहे. या योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही आपने दिला आहे.भुयारी गटार योजनेच्या कामाकरिता शहरातील असा एकही रस्ता व गल्लीबोळ शिल्लक नाही की, जी खोदलेली नाही. परिणामी, रहदारीला अडथळा निर्माण होत असून दररोज किरकोळ अपघात होत आहे. मात्र, याकडे लक्ष द्यायला संबंधित नगरसेवक, लोकप्रतिनिधींकडे वेळ नाही. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. योजनेला अल्पावधीतच ग्रहण लागले असून बिडकर वॉर्डात पंधरवड्यापूर्वी बांधण्यात आलेले चेंबर फुटून मोठा खड्डा तयार झालेला आहे. त्यामुळे योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. चेंबर फुटून खड्डा तयार झाल्याने यात कुणी पडून अपघात झाल्यास सर्वस्वी जबाबदार कोण असेल, असा प्रश्नही ‘आप’ने केला आहे. शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही. सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत असून बांधकामाची सखोल चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी आपने निवेदनातून केली आहे.या प्रकरणी कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मुख्यधिकाºयांना निवेदन देताना प्रफुल्ल क्षीरसागर, भाऊराव कोटकर, जयंत लोहकरे, संदेश वासेकर, निसार, विनोद कुंभारे आदी उपस्थित होते.हिंगणघाटातही योजना वादातवर्ध्यातही नियोजनाच्या अभावात भुयारी गटार योजना राबविण्यात आली. नुकतेच बांधलेले सिमेंट रस्ते फोडण्यात आले. यामुळे विरोधी पक्ष, सामाजिक संघटनांनी प्रारंभीपासूनच विरोध दर्शविला. आता हिंगणघाटातही या योजनेवरून काहूर माजले आहे.नियोजनाचा अभाव असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ही भुयारी गटार योजना फसण्याचीच अधिक शक्यता नागरिकांतून वर्तविली जात आहे.मजबूत रस्ते या योजनेकरिता फोडल्यामुळे शासनाचे दुहेरी नुकसान होण्याची शक्यता आहे.भुयारी गटार योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणीभुयारी गटार योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जिल्ह्यातील ज्या-ज्या नगरपालिकेत ही योजना राबविली जात आहे. त्या ठिकाणी या योजनेची बोंबाबोंबच आहे. या योजनेचे काम करतांना कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोपही होत आहे. अल्पावधीतच या कामाला तडे गेल्याने कोट्यवधीच्या निधीचा चुराडा होत असल्याची ओरड होत आहे.पण, नगरपालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.