शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
2
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
3
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
4
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
5
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
6
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
7
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
8
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
9
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
10
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
11
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
12
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
13
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
15
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
16
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
17
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
18
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
19
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
20
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात

पिपरी व १३ गावांसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना

By admin | Published: May 03, 2017 12:35 AM

पिपरी(मेघे) व १३ गावे वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या २७ कोटी ४४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास राज्य

२७.४४ कोटींचा खर्च : जीवन प्राधिकरण करणार काम वर्धा : पिपरी(मेघे) व १३ गावे वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या २७ कोटी ४४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने शासन निर्णयाद्वारे मंजुरी प्रदान केली आहे. शहरासभोवताल झपाट्याने वाढणाऱ्या लोकवस्तीच्या गरजेनुसार पाणीपुरवठा उपलब्ध होण्याकरिता ही वाढीव योजना उपयोगी ठरणार आहे. तसे पत्र पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी मुंबई येथे दिल्याची माहिती वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत या वाढीव योजनेचे काम होणार आहे. या मंजुरीमुळे पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, दत्तपूर, मसाळा, उमरी(मेघे), सावंगी(मेघे), बोरगाव(मेघे) आणि वायगाव(नि.) या गावांसह सिंदी(मेघे), सालोड(हिरापूर) येथील नवीन वस्तींना वाढीव पाणीपुरवठा योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत एकूण सात पाणीटाक्यांची निर्मिती केली जाणार आहे. उमरी(मेघे) व सिंदी(मेघे) या गावांकरिात ८ लाख लिटरची एकत्रित टाकी, पिपरी (मेघे) गावासाठी ३.५० लाख लिटरची टाकी, सावंगी(मेघे) करिता ९.५० लाख लिटरची टाकी, बोरगावसाठी २ लाख लिटर, आलोडा व साटोडासाठी ४ लाख लिटरची, नालवाडी व दत्तपुरसाठी एकत्रित ७.५० लाख लिटरची, वायगाव(नि.) साठी दोन लाख लिटरची टाकी बनविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी) नव्या योजनेवर १५ हजार ५०० नळजोडण्या या वाढीव योजनेंतर्गत संबंधित गावांना शुद्ध पाणी प्राप्त व्हावे, याकरिता पाणीनलिका अंथरण्यात येणार आहे. या १४ गावामध्ये २१० किलोमीटर लांबीची जलवाहिनी (पाईपलाईन ) अंथरण्यात येईल. सध्या जुन्या योजनेवर १५ हजार ५०० नळजोडण्या आहेत. नवीन वाढीव योजनेमुळे आणखी तीन ते चार हजार नळजोडण्या देणे शक्य होणार आहे. या १४ गावांची सन २०२७ मधील संभाव्य लोकसंख्या २ लाख ३९ हजार ३१९ गृहीत धरुन त्यानुसार या वाढीव योजनेचे कार्यान्वयन होणार आहे. या वाढीव योजनेंतर्गत टाक्या जलदगतीने भरण्याकरिता ३०० बीएचपीचे मोटारपंप वापरले जाणार आहेत. या वाढीव योजनेतही नळजोडणी घेणाऱ्यांकडे मीटर बसविले जाणार असून, जितका पाण्याचा वापर, तितके देयक असणार आहे. यातुन पाणी बचतीविषयीही जागृती निर्माण होईल, असे आमदार डॉ. भोयर यांनी कळविले आहे. पिपरी (मेघे) व १३ गावे वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास व आराखड्यात मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मान्यता दिल्याचे आमदार डॉ. भोयर म्हणाले. दोन वर्षांची मुदत येत्या एक महिन्यात पिपरी(मेघे) व १३ वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाची निविदा निघणार असून, येत्या दोन वर्षांत ही योजना पूर्ण करायची आहे. या योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाल्यावर किमान तीन वर्षे कंत्राटदाराला योजना चालविणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजना यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे की नाही, याची खात्री जीवन प्राधिकरणाने करायची आहे. या योजनेचे कार्यान्वयन जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पी.एस. वाघ यांच्या मार्गदर्शनात उपअभियंता व्ही.पी. उमाळे व शाखा अभियंता प्रदीप चवडे हे करणार आहेत.