रूपेश खैरी ।आॅनलाईन लोकमतवर्धा : सायबर सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आॅनलाईन फसणवुकीच्या गुन्ह्यांचे तार शोधण्यात वर्धा पोलिसांना यश आले असून फसवणुकीच्या तारा थेट दिल्लीत जुळल्या असल्याचे समोर आले आहे.शासन मान्य संकेतस्थळ विकास केंद्र बनावट कॉलसेंटर चालवून सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालणाऱ्या दोघांना दिल्ली येथील तिलक नगर आणि करोल बाग येथून वर्धा पोलिसांनी अटक केली. यातील एकाचे नाव हिमांशु अरोरा व विपुल अरोरा असे असून त्याला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दोघांकडून काम करून घेणारा या सर्व प्रकाराचा मास्टर मार्इंड तुषार अरोरा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटकेत असलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल ३० मोबाईल जप्त केले आहे. यात मोबाईलवरून केलेल्या कॉल्सची माहिती घेतला असता या दोघांनी राज्यातीलच नाही तर अख्या देशातील नागरिकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.वर्धेत घडलेल्या १ लाख ६० हजार रुपयांच्या गुन्ह्याचा तपास करताना हा प्रकार उघड झाला आहे. या तपासाची लिंक शोधत वर्धा पोलिसांनी दिल्ली गाठली असता एका मोबाईलच्या दुकानातून सिम खरेदीच्या प्रकारातून हा गुन्हा उघड झाल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.चार महानगरातील गुन्हेच्दिल्ली येथून अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून एकूण ३ लाख ६७ हजार रुपयांचे गुन्हे उघड झाले आहे. यात औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे तसेच वर्धा व मध्यप्रदेशातील इंदोर येथील गुन्ह्याचा समावेश आहे.अनेकांनी तक्रारीच केल्या नाहीच्पोलिसांनी जप्त केलेल्या ३० मोबाईलची तपासणी केली असता तेथून देशभर फोन केल्याचे समोर आले आहे. फोन केलेल्या प्रत्येकालाच या फ्रॉड कॉल सेंटरवरून गंडा बसल्याचे समोर आले आहे. यापैकी अनेकांनी तक्रारीच केल्या नसल्याचे यात समोर आले आहे. यामुळे या तिघांकडून नेमका किती जणांना गंडा बसला हे सांगणे कठीण असल्याचे समोर येत आहे. यात आणखी किती गुन्हे समोर येतात याकडे पोलिसांचे लक्ष आहे.रोज १५०० जणांना कॉलच्या आॅनलाईन चोरट्यांकडून रोज सुमारे १ हजार ५०० जणांना कॉल करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. येथे सापडलेल्या ३० सिमकार्ड पैकी एका कार्डावरून दिवसाला ५० फोन जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
महाराष्ट्रातील आॅनलाईन फसवणुकीचे कनेक्शन दिल्लीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 2:15 PM
सायबर सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आॅनलाईन फसणवुकीच्या गुन्ह्यांचे तार शोधण्यात वर्धा पोलिसांना यश आले असून फसवणुकीच्या तारा थेट दिल्लीत जुळल्या असल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्देदोघांना अटकमुंबई, पुणे, औरंगाबाद येथील गुन्हेही उघड