सिद्धार्थ बुटले : संविधानावर व्याख्यानवर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध तत्वज्ञानातील समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या मुल्यांवर आधारित संविधान हा मानवमुक्तीचा जाहीरनामा तयार केला आहे. यामुळे प्रत्येकाला आज हक्काचे जीवन जगता येते, असे मत महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले यांनी व्यक्त केले.अनेकांत स्वाध्याय मंदिरात महाराष्ट्र अंनिस व राष्ट्र सेवा दल आणि अनेकांत स्वाध्याय मंदिर यांचे संयुक्त विद्यमाने अभ्यास शिबिर घेण्यात आले. भारतीय संविधानाची वाटचाल यश, अपयश या विषयावर घेण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. भारतीय संविधानाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तरच मानव समूह विकासाच्या प्रवाहात येईल. त्यासाठी सर्वांनी संविधान समजून घेवून त्यादृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे, असे ते पुढे बोलताना म्हणाले. यासह उपस्थितांनी विचार मांडले. शिबिराचे अध्यक्ष म्हणून अरुण चवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गजेंद्र सुरकार उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्र अंनिसच्या कार्याचा आढावा कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय सुनील ढाले यांनी केले. संचालन भिमसेन गोटे यांनी तर आभार अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाला भरत कोकावार, नरेंद्र कांबळे, अनिल मुर्डीव, वनश्री वंडकर, अजय मोहोड, राजेंद्र ढोबडे, सुधाकर मिसाळ, शहरातील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)
भारतीय संविधान मानवमुक्तीचा जाहीरनामा
By admin | Published: July 01, 2016 2:12 AM