लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे संपूर्ण जीवनच संघर्षमय होते. त्यांचे संपूर्ण जीवनचरित्रच काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय प्रवक्त्या शोभा ओझा यांनी केले. त्या वर्धा येथे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने आयोजित इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमात बोलत होत्या.व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व जन्मशताब्दी समितीचे सचिव मुकूल वासनिक, विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस नेटा डिसुजा, महाराष्ट्र महिला काँग्रसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, माजी मंत्री तथा आमदार रणजित कांबळे, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे, आमदार अमर काळे, आमदार विरेंद्र जगताप, नंदिनी पारवेकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शेखर शेंडे, जि.प. माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, ज्ञानेश्वर ढगे, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, शहर अध्यक्ष राजेंद्र शर्मा, महिला जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे आदी उपस्थित होते.माणिकराव ठाकरे यांनी शेतकºयांना कमीत कमी कर्जमाफीची रक्कम मिळाली पाहिजे. त्यासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी राज्य सरकारने मागे घेतल्या पाहिजे. भाजपाचे हे सरकार धनदांडग्यांचे सरकार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. काँग्रेसच्या काळात शेतकºयांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक चारूलता टोकस यांनी केले.मोदी ईव्हेंट मॅनेजर - काँग्रेसची टीकादेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्कृष्ट ईव्हेंट मॅनेजर आहेत, असे एका कार्यक्रमात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संबोधीले होते. त्याच प्रमाणे त्याची कार्यपद्धती सुरू आहे. केवळ पैसे खर्च करणे ऐवढेच काम सध्या देशात सुरू आहे. रेल्वेच्या भाड्यात ७० टक्के वाढ केली तरीही देशात अपघात सुरू आहे. हे सरकार सुट-बुट वाल्यांचे आहे, अशीही टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शोभा ओझा यांनी केली.
इंदिराजींचे जीवन कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:26 PM
भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे संपूर्ण जीवनच संघर्षमय होते.
ठळक मुद्देशोभा ओझा : महिला काँग्रेस तर्फे शताब्दी वर्ष कार्यक्रम