वर्धा : पर्यटन विकास कामाकरिता ६० लाख रुपयांचा पर्यटन विकास निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. ही माहिती खासदार तथा सेवाग्राम विकास आराखडा सनियंत्रण समितीचे सदस्य रामदास तडस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या निधीतून सेवाग्रामचा विकास साधण्यात येणार आहे.सेवाग्राम येथील पर्यटन विकास कामाचे विविध प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आलेले आहे. त्यापैकी २२ मार्च २०१६ रोजी सेवाग्राम पर्यटन विकासाकरिता ६० लक्ष रुपये मंजूर झाल्याची माहिती महाराष्ट्राचे पर्यटन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दुरध्वनीद्वारे खा. तडस यांना दिल्याची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पर्यटन विभागाचा कार्यभार आहे. पवनार आश्रम व सेवाग्राम आश्रमाचे फार मोठे महत्त्व असून जगभरातून लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. या पर्यटन स्थळांना जोडणारा रस्तासुद्धा चांगल्या दर्जाचा असायलाच हवा या भावनेतून पवनार ते सेवाग्राम आश्रम हा दोन आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांना जोडणारा एकमेव प्रमुखमार्ग चौपदरीकरण व सौंदर्यीकरण करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खा. तडस यांनी कळविले आहे.(प्रतिनिधी)
सेवाग्राम विकासाकरिता ६० लाख प्राप्त निखासदारांची माहिती : पर्यटन विकास निधी
By admin | Published: March 26, 2016 2:03 AM