शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

अल्पवयीन मुले अश्लील साईटच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:38 PM

शहरासह ग्रामीण भागातही सध्या स्मार्ट फोनचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक व्यक्तीसह अल्पवयीन मुला-मुलीकडेही स्मार्ट फोन आले आहेत.

ठळक मुद्देपालकांचे दुर्लक्ष : सावधगिरी बाळगणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : शहरासह ग्रामीण भागातही सध्या स्मार्ट फोनचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक व्यक्तीसह अल्पवयीन मुला-मुलीकडेही स्मार्ट फोन आले आहेत. पण लहान मुलांकडून याचा दुरूपयोग वाढल्याची बाब निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुले या माध्यमातून अश्लिल साईटला भेटी देत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. संचार क्षेत्रातील क्रांतीमुळे सर्वत्र मोबाईलचे जाळे पसरले आहे. या जाळ्यात शहरीसह ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थीही गुरफटत आहेत. मुले संपर्कात राहावी यासाठी त्यांच्या हाती मोबाईल देण्याचा घातक प्रकार सुरू झाला आहे. त्याचबरोबर अनेक पालकांना स्मार्टफोन समजत नसल्याने त्यांचे फोनही लहान मुलेच सांभाळतात. पण गेम खेळण्याचा नांदात ही मुले आता मोबाईलच्या सहाय्याने अश्लील साईटला भेटी देत असल्याचे प्रकार समोर येत आहे.मुलामुलींच्या हट्टापायी पालक सर्रास त्याच्या हातामध्ये स्मार्टफोन सोपवत आहेत. त्यामुळे लहान मुले त्याचा वाटेल तसा वापर करीत आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या साईटमधून व्हिडीेओ घेणे आणि इतरांना सुद्धा देण्याचा प्रकार वाढला आहे. स्मार्ट फोनमुळे हे सहज शक्य व स्वस्तही झाले आहे.कुटुंब प्रमुख असो अथवा घरातील इतरही लोकांसमोर मुलगा मोबाईलवर गुंग राहतो. मुले पालकांना मोबाईल मागून घेत त्यात डोके खुपसून बसतात. घरोघरी हाच प्रकार पाहावयास मिळत आहे. पण आपला मुलगा मोबाईलमध्ये काय पाहतो. याची तपासणी पालकांनी करणे गरजेचे झाले आहे.शहरी व ग्रामीण भागात अनेक मोबाईल शॉपी सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये १४ ते २५ वयोगटातील मुले-मुली मोबाईल खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. त्यामुळे पालक नसताना लहान मुलांना मोबाईल विकावा लागतो. धंदा असल्याने आम्ही मुलांनाही मोबाईल विक्री करतो,अशी माहिती मोबाईल विक्रेत्याने लोकमतशी बोलताना दिली.एकीकडे शाळेत सादर करावयाचे प्रकल्प अधिकाधिक चांगल्या प्रकारे बनविण्यासाठी स्मार्टफोनचा वापरही काही मुले करीत आहेत. त्यामुळे एकीकडे स्मार्टफोन ही गरज असली तरी त्याचा सावधगिरी वापर करणे आवश्यक आहे .मुलं यातून काय पाहतात याकडे पालकांचे लक्ष असायलाच हवे.-अल्का पंडीत, मानसशास्त्र तज्ज्ञ