लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एसटी कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील १ हजार ६६२ कामगार सहभागी झाले आहे. मागण्यांवर तोडगा न निघाल्याने बुधवारी दुसºया दिवशी वर्धा आगारातील कामगारांनी मुंडण करून शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील पाचही आगारातील ३१५ बसेस आगारातच उभ्या होत्या.बेमुदत संप करणाºया रापमच्या कामगारांनी बुधवारपासून कामावर रूजू व्हावे अन्यथा निलंबनाची कारवाई केली जाईली, असे शासनाने जाहीर केले आहे. या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी वर्धा आगारातील रापमच्या कामगारांनी मुंडण करून नारेबाजी केली. रापम कामगारांच्या बेमुदत संपामुळे बुधवारी दुसºया दिवशीही जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा बसस्थानकावर स्मशान शांतता होती. आंदोलकांनी मुंडन करून रापमच्या कामगारांना समाधानकारक वेतन देण्यात यावे, महागाई भत्ता लागू करावा, कामगार हिताचा वेतन करार करावा आदी मागण्या रेटून धरल्या. आंदोलनात कामगार सहभागी झाले आहेत.१.१० लाख विद्यार्थ्यांची तारांबळरापम कामगारांचा संप आश्वासन मिळाल्यानंतर मागे घेत बुधवारपासून बसेस सुरू होतील, अशी आशा होती; पण बुधवारीही संप सुरूच राहिल्याने बसचा प्रवास करणाºया जिल्ह्यातील १ लाख १० हजार विद्यार्थ्यांसह एक हजार मासिक व त्रैमासिक पासधारकांची गोची झाली. नियमित ग्राहक असलेल्या या प्रवाशांना बस न धावल्याने खासगी प्रवासी वाहनांचा वापर करावा लागला.५० लाखांचा फटकाबेमुदत संपामुळे पाच आगारातील ३१५ बसेस बंद आहे. दररोज सुमारे ५ हजार फेºयांतून रापमच्या वर्धा विभागाला २५ लाखांचे उत्पन्न होते; पण दोन दिवस एकही बस न धावल्याने ५० लाखांचा फटका सहन करावा लागला.संपात जिल्ह्यातील १ हजार ६६२ कामगार सहभागी झालेत. ज्या वर्ग दोनच्या अधिकाºयांना रापमद्वारे ५ हजार रुपये बोनस मिळाला, तेच सुमारे १५ अधिकारी बुधवारी कर्तव्यावर होते.
मुंडण करून नोंदविला कामगार विरोधी धोरणांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:40 PM
एसटी कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील १ हजार ६६२ कामगार सहभागी झाले आहे.
ठळक मुद्दे३१५ बसेस बंद : एसटी कामगारांच्या बेमुदत संपाचा दुसरा दिवस