लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुणे येथील मनादेव जाधव नामक व्यावसायिकाने एका कार्यक्रमात शिक्षकांना देशद्रोहीसारखे बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात निषेध नोंदविण्यात आला. स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन करण्यात आले. शिवाय विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.जाधव यांची हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले आहे.या आंदोलनात तक्रार निवारण समितीचे पुंडलिक नागतोडे, संजय बारी, कुंडलिक राठोड, मुकेश इंगोले, सुनील गायकवाड, उमेश खंडार, धीरज समर्थ, प्रशांत चौधरी, महेंद्र सातपुते, अभिजीत जांभुळकर, मंगेश आकर्ते, आतीश निंबाळकर, गजानन साबळे, मनोज मेटकर, डॉ. अनिस बेग, अनिल वरकडे, उत्तम नन्नारे, सतीश झाडे, प्रकाश नानोरे, दिलीप मोहोड, पराग वाघ, अनंता पोराटे, ज्ञानेश्वर घुगे, परमेश्वर केंद्रे, विलास बरडे, किशोर उमाटे, संदीप चांभारे, दीपक कदम, प्रवीण वास्कर, अतुल गोटे, पी. आर. चौधरी, मनोज खंते यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिक्षकांविरूद्धच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 12:13 AM
पुणे येथील मनादेव जाधव नामक व्यावसायिकाने एका कार्यक्रमात शिक्षकांना देशद्रोहीसारखे बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीच्यावतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात निषेध नोंदविण्यात आला.
ठळक मुद्देजि.प. कार्यालयासमारे ‘जोडेमार’ आंदोलन : तक्रार निवारण समितीने व्यक्त केला रोष