शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

जमीन संपादनाच्या मोबदल्यात अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 9:47 PM

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाºया जमिनीचा मोबदला चौरस मीटरप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देचौरस मीटरप्रमाणे रक्कम द्या : भूमिपूत्र संघर्ष वाहिनीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाºया जमिनीचा मोबदला चौरस मीटरप्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा दर मोबदल्याच्या स्वरूपात हेक्टर आर प्रमाणे देण्यात आलेला आहे; पण याच प्रकल्पासाठी संपूर्ण यवतमाळ, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकºयांना नॅशनल हायवेज अ‍ॅक्ट १९५६ च्या तरतुदीनुसार चौरस मिटर व त्यावरील चार गुणक प्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. याबाबत शेतकरी व भूमिपुत्र संघर्ष वाहिनेने जिल्हाधिकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील खडका (भूसंपादन मामला क्र. ६/४७/२०१५-१६) येथील पारित करण्यात आलेला अंतिम निवाडा सादर केला आहे. वर्धा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. शिवाय सध्या शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. शेती संपादीत करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे रोजगाराचे साधन हिरावले जाणार आहे. त्यांना मिळालेला मोबदला पुढील आयुष्य जगण्यासाठी व निर्वाहासाठी आधार आहे. त्यामुळे भूसंपादनाच्या या विषयाकडे लक्ष घालून वर्धा जिल्ह्यातील राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादीत होणाऱ्या जमिनीचा दर चौरस मिटर व त्यावरील चारचा गुणक प्रमाणे लावून मोबदला देण्यात यावा. अन्यथा भूमिपुत्र संघर्ष वाहिनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करेल, असा इशारा संघर्ष वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके पाटील यांनी दिला आहे. सोमवारी या शेतकºयांना घेवून भूमिपुत्र संघर्ष वाहिनी विभागीय आयुक्त नागपूर यांची भेट घेणार आहे. यासंदर्भात शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. याप्रसंगी योगेश घोगरे, प्रवीण पेठे, रितेश घोगरे, प्रवीण काटकर, राम डायगव्हाणे, शेतकरी उदय देशमुख, संजय मेहत्रे, अविनाश कुबडे, कुणाल देशमुख, निलेश वाघ, धनंजय चरडे, नरेंद्र वघळे, प्रताप चरडे, जाहीद खाँ पठाण, मुशीर पठाण, दत्तात्रय चरडे, सतीश देशमुख, रामानंद नागतोडे, जगदीश बदरीया, किशोर मडावी, गणेश वघळे, लक्ष्मण बदरिया, दत्तात्रय राऊत, अरविंद देशमुख, विलास मेहत्रे, रत्नाकर चरडे, विनोद फटींग, रवी रूईकर, मनोहर हजारे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :highwayमहामार्गFarmerशेतकरी