उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना निवेदन : दोषींवर कठोर कार्यवाहीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यातील बोपापूर, पोहणा येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले. परंतु, सदर कामात कंत्राटदाराने गैरप्रकार केल्याचा आरोप करीत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनातून, जलयुक्त शिवाराचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने अधिकाऱ्यांना हाताशी घेत जादाची देयके काढली आहे. त्याचप्रमाणे समुद्रपूर तालुक्यातील गिरड मंडळांतर्गत राष्ट्रीय कृषी विभाग योजना, एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम, गतिमान पाणीलोट विकास कार्यक्रम, विदर्भ सिंचन विकास कार्यक्रम या चार जुन्या योजनेमध्ये झालेली शेततळे मागेल त्याला शेततळे योजनेते दाखवून अनुदानाची रक्कम उचलल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत काम देताना मर्जीतील कंत्राटदारांना कामाचा कंत्राट देण्यात आला. वास्तविक पाहता अनेक कंत्राटदार कमी दराने काम करण्यास तयार होते. त्यांना तांत्रिक बाबीचे कारण देवून डावलण्यात आले. जलयुक्त शिवार कामाच्या ई-टेंडरींग प्रक्रियेची चौकशी करावी. तसेच नाला खोलीकरण व तलाव खोदकाम कामात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जलयुक्त शिवाराच्या कामांची चौकशी करा
By admin | Published: June 04, 2017 1:03 AM