लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत दोन वर्ष निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. यंदा कुठल्याही किटकांचा प्रादुर्भाव न होता भरघोस उत्पन्न होईल, अशी आशा शेतकऱ्यांना असताना उभ्या पिकांवर गुलाबी बोंडअळी, तुडतुडे, चक्रीभुंगा, ऊंटअळी व लष्करीअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किटकांचा प्रादुर्भाव तब्बल २१ गावांमधील उभ्या पिकांवर असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत पुढे आले असून तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे. दिवसेंदिवस या किटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांच्याही अडचणीत भर पडली आहे.१ जुन ते २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीची ९७२.२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सद्यस्थितीत हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर कपाशीची लागवड २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर झाली आहे. सद्या हे पीक फुलोरा अवस्थेत आहे. परंतु, हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव, बालापूर, चाणकी येथे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तसेच वर्धा तालुक्यातील पालोती, तळेगाव, सेलू तालुक्यातील खापरी, देवळी तालुक्यातील गुजीखेडा, कवठा हिंगणघाट तालुक्यातील धामनगाव, खापर, माडला, बाबापुर, सातेफळ, भिवापूर, आर्वी तालुक्यातील मदना व आष्टी तालुक्यातील नरसिंगापुर येथे रसशोषण करणाºया किडीचा म्हणजे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. सायोबीन पिकाची १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सद्यस्थितीत हे पीक फुलोरा अवस्थेत असून पिकावर चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव देवळी तालुक्यातील कवठा येथे आढळून आला आहे. तर वर्धा तालुक्यातील भिवापूर, हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव व कडाजना या गावामध्ये या पिकावर ऊंटअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. तर कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी या गावात मका पिकावर लष्करीअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.कृषी विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात उपाययोजना केल्यास या किटकांना अटकाव घालता येत असला तरी योग्य मार्गदर्शनाअभावी शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही शेतकºयांची आहे.
उभ्या पिकांवर किटकांचा अटॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:14 AM
१ जुन ते २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीची ९७२.२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सद्यस्थितीत हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर कपाशीची लागवड २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर झाली आहे.
ठळक मुद्दे२१ गावांत बोंडअळी, तुडतुडे, चक्रीभुंगा, ऊंटअळी, लष्करीअळीचा प्रादुर्भाव