लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : सिंदी (रेल्वे) मध्ये सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेले १९ व्यक्ती हाय रिस्क मध्ये आहे. १९ व्यक्ती पैकी १० व्यक्तींना सामान्य रुग्णालय वर्धा तर ९ व्यक्तींना मध्य रेल्वे हॉस्पिटल नागपूर येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये येणाऱ्या ३० घरातील १२५ लोकांचे गृहविलगीकरण करण्यात आले तसेच त्याच्या संपर्कातील लो रिस्क मधील २७ परिवाराला होम क्वांरटाईन करण्यात आले आहे.या सर्व बाबीचा आढावा घेण्याकरिता उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, सेलूचे तहसिलदार महेंद्र सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, मुख्याधिकारी कैलास झंवर यांनी कंटेन्मेंट झोनला भेट देऊन पाहणी केली. कंटेन्मेंट झोन मध्ये राहणाऱ्या लोकांकरिता लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू नगर परिषद कर्मचाऱ्याच्याद्वारा त्यांना पुरवठा करण्यात याव्या व कंटेन्मेंट झोन मध्ये ३५ कॅमेरा बसविण्याबाबत उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच या झोन मधील शेतकºयांना शेतीच्या कामाकरिता त्रास होऊ नये या करिता शेतकºयाचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तहसिलदार महेंद्र्र्र सोनवणे यांना निर्देश दिले.पोलिसांची कंटेन्मेंट झोनमध्ये चौकी लावण्या संदर्भात उप अधीक्षक पियुष जगताप यांनी पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांना निर्देश दिले. शहरात दोन दिवस जनता कर्प्यू लावण्यात आला असून रूग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाने या भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी अभियान सुरू केले आहे.
सिंदीतील कंटेन्मेेंट झोनची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 5:00 AM
या सर्व बाबीचा आढावा घेण्याकरिता उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, सेलूचे तहसिलदार महेंद्र सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले, पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, मुख्याधिकारी कैलास झंवर यांनी कंटेन्मेंट झोनला भेट देऊन पाहणी केली.
ठळक मुद्देमहसूल, पोलीस अधिकारी पोहोचले : नागरिकांना घरपोच वस्तूंचा पुरवठा करा