लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील कपाशी पिकांसोबतच इतर शेतमालाबाबतची दुष्काळी स्थिती लक्षात घेता खासदार रामदास तडस यांनी या भागाची पाहणी केली.कपाशीचे पीक वाढले आहे. परंतु, बोंडे नाहीत. आहे ती बोंडे सततच्या पावसामुळे सडली आहेत. काही पऱ्हाट्या पिवळ्या पडून भडंगल्या आहे, अशा प्रकारची भावना खासदार तडस यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र शासनाने या भागाची पाहणी करून नुकसानीचा आढावा घ्यावा. राज्य शासनाला तशा प्रकारचे निर्देश देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार तडस यांनी केली. यावेळी जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, तालुका कृषी अधिकारी अतुल वायस व भिडीचे माजी सरपंच राजू रोकडे उपस्थित होते. यावेळी खासदार तडस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून तालुक्यातील भिडी, दुरगुडा, हुस्रापूर, आकोली, चोंडी, हेटी आदी गावातील शेतमालाची पाहणी केली. काही ठिकाणी चार पदरी रस्त्याच्या उंच बांधकामामुळे तसेच यामुळे शेतातील पाणी बाहेर निघण्यास मार्ग नसल्याने सोयाबीनचे पीक पाण्याखाली येऊन जागीच सडले आहे. लाल्यामुळे कपाशीचे पीक भडंगले असून आजच नसल्यात जमा झाले आहे. पाणबसन जमिनीतील सोयाबीनचे पीक अजूनही सवंगण्याअभावी पडले आहे. हुस्रापूर येथील सुभाष फुलकर वाबगावातील धनराज पाल, चोंडी येथील राजू रोकडे, भिडी येथील विनोद पांडे, प्रमोद कडूकर, मनोज बोबडे तसेच आकोली येथील भगवान बोडे यांच्या शेतातील पऱ्हाटी व सोयाबीन पिकाची दैना झाली आहे. तालुक्यात पाच हजार ७५५ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. यापैकी ५ हजार ४५७ शेतकऱ्यांच्या पीककर्जातून विम्याची रक्कम कपात करण्यात आली. २९८ शेतकºयांनी पीक विम्याची रक्कम भरली. या विम्याचा फायदा शेतमालाला होईल काय? याबाबत अधिकाºयांकडे उत्तर नसल्याने हा विमा दरवर्षीप्रमाणे स्टंट ठरू पाहत आहे. शासनाने लक्ष देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार तडस यांनी केली आहे.पावसामुळे बाधीत झालेल्या शेतमालाचे पंचनामे करण्यासाठी शासनाने आदेश दिले आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. पंचनामे नि:पक्ष पद्धतीने केली जाणार आहे.- अतुल वायस, तालुका कृषी अधिकारी, देवळी
खासदारांकडून नुकसानग्रस्त शेतांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 6:00 AM
लाल्यामुळे कपाशीचे पीक भडंगले असून आजच नसल्यात जमा झाले आहे. पाणबसन जमिनीतील सोयाबीनचे पीक अजूनही सवंगण्याअभावी पडले आहे. हुस्रापूर येथील सुभाष फुलकर वाबगावातील धनराज पाल, चोंडी येथील राजू रोकडे, भिडी येथील विनोद पांडे, प्रमोद कडूकर, मनोज बोबडे तसेच आकोली येथील भगवान बोडे यांच्या शेतातील पऱ्हाटी व सोयाबीन पिकाची दैना झाली आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । केंद्र सरकारकडे तातडीची मदत मागणार, शेतकऱ्यांना दिला विश्वास