आॅनलाईन लोकमतवर्धा/टाकरखेड : आर्वी तालुक्यातील टाकरखेड येथील श्री संत लहानुजी महाराज संस्थानकडून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही या उपक्रमांची दखल घेत संस्थानला भेट देत पाहणी केली. यावेळी विविध उपक्रमांची माहितीही जाणून घेण्यात आली.टाकरखेडा येथील संत लहानुजी महाराज संस्थानला दिलेल्या भेटीत संस्थानद्वारे चालविल्या जाणाºया विविध उपक्रमांची पाहणी करीत प्रशंसा केली. जिल्ह्यातील विविध देवस्थानांनी याचप्रमाणे समाजोपयोगी प्रबोधनपर उपक्रम राबवावेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. संस्थानचे कार्यकारी संचालक बाळासाहेब पावडे व त्यांच्या सहकाºयांनी जिल्हाधिकारी नवाल यांना संस्थानद्वारे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थानच्या रोख कायम मुदती ठेवीत सातत्याने होणारी वाढ, त्यावरील व्याजावर राबविले जाणारे विविध उपक्रम, शेतकरी हिताशी राखलेली बांधिलकी, परिसरातील शिस्त व स्वच्छता अशा विविध बाबींची माहिती देत संस्थानच्या विकास वाटचालीबाबत सांगितले.नवाल यांनीही विविध संस्थानच्या उपक्रमांची पाहणी केली. संत लहानुजी महाराजांच्या साध्या निवासस्थानात काही वेळ त्यांनी घालविला. असेच उपक्रम जिल्ह्यातील विविध देवस्थानांनी राबविले तर जिल्ह्यात आगळे चित्र उभे राहिल. विविध देवस्थान संचालकांनी या देवस्थानला एकदा अवश्य भेट द्यावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.संत लहानुजी महाराज संस्थानद्वारे सेंद्रीय शेती, गोरक्षण, अन्नदान योजना, सामूहिक स्वच्छता, गोबरगॅस, सेंद्रीय शेतीकरिता आवश्यक फवारणीचे साहित्य तयार करणे, शेतकरी प्रशिक्षण आदी उपक्रम राबविले जातात. गोबरगॅसच्या मदतीनेच दररोज हजारो भाविकांकरिताचा स्वयंपाक शिजविला जातो. टाकरखेडा येथील सरपंच, सदस्य व पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, महिला यांच्याशी संस्थानचा सुसंवाद असल्याने विकासाला हातभार लागतो, असे नवाल यांना सांगण्यात आले. ही आकस्मिक भेट होती. यात कामातील पारदर्शकता त्यांना दिसली. यावेळी अशोक पावडे, पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.गोबरगॅस प्रकल्पासह शेतकरी संलग्नित उपक्रमांची प्रशंसाश्री संत लहानुजी महाराज देवस्थानकडून शेतकरी संलग्नित विविध उपक्रम राबविले जातात. गुरांच्या शेणाचा गोबरगॅसमध्ये वापर होत असल्याने तो शेतकऱ्यांना आधार ठरणारा आहे. शिवाय संस्थानच्या अन्य उपक्रमांचीही जिल्हाधिकारी नवाल यांनी प्रशंसा केली. कामकाजातील पारदर्शकता पाहून समाधान व्यक्त करीत अन्य संस्थांनीही हे उपक्रम राबविण्याचे सुतोवाच केले.