लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडण्यात आलेल्या ईसापूर येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून शेतकऱ्यांना बोंडअळी रक्षक ट्रॅप बाबत मार्गदर्शन केले. शिवाय त्यांनी कृषी विभाग व बजाज फाउंडेशनच्यावतीने पूर्णत्वास आलेल्या जलयुक्त शिवार कामाची पाहणी केली.याप्रसंगी त्यांच्या सोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, प्रभारी तहसीलदार बाळू भागवत, मंडळ कृषी अधिकारी सांगळे, सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानचे जिल्हा समन्वयक प्रवीण कुऱ्हे, सरपंच प्रणीता आंबटकर, उपसरपंच नितीन करपती आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कपासीच्या पिकावर येणाऱ्या बोंडअळीवर उपाय म्हणून बसविण्यात येणाºया रक्षक ट्रॅप बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच हे रक्षक ट्रॅप कमी खर्चात घरी कसे बनविता येईल या विषयी सोप्या शब्दात माहिती दिली. शेतकºयांनी रासायनिक खते व किटकनाशके न वापरता सेंद्रीय शेतीची कास धरली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी सेंद्रीय शेतीवर भर देवून बोंडअळी नियंत्रणाबाबत माहिती दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी शेतकरी विजय पोटे यांच्या शेतात बोंडअळी नियंत्रणासाठी लावलेल्या रक्षक ट्रॅपची पाहणी केली. तसेच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या व होत असलेल्या विविध कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी काही शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संवाद साधला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंदू पोटे, विनय महाजन, पोलीस पाटील रमेश ढोकणे, ग्रामसेवक पुजा आडे, तलाठी मडावी, ग्राम परिवर्तन दूत सुदीप देशमुख, कृषी सहाय्यक योगीता केदार, मनोज साठे, कुणाल भामरे, राजू करपती आदींची उपस्थिती होती.
इसापुरातील जलयुक्त कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:30 PM
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत निवडण्यात आलेल्या ईसापूर येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी भेट देवून शेतकऱ्यांना बोंडअळी रक्षक ट्रॅप बाबत मार्गदर्शन केले. शिवाय त्यांनी कृषी विभाग व बजाज फाउंडेशनच्यावतीने पूर्णत्वास आलेल्या जलयुक्त शिवार कामाची पाहणी केली.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद