लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : ऊन, वारा, वादळ पावसाचा मारा सहन करीत देशाचा सैनिक डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करतो म्हणून आपण सुखाची झोप घेतो. सीमेवर सैनिक आहे म्हणून देश सुरक्षित आहे. देशाचे रक्षण करताना तो आपल्या प्राणाची आहुती देतो. त्यांच्या शौर्याची गाथा जगाला कळावी म्हणून तो जरी वीरगतीस प्राप्त झाला, तरी त्याच्या स्मारकांपासून आजच्या तरूण पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळाली पाहिजे, असे मौलिक विचार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.नाचणगाव शेंडे लेआऊट येथे नुकतेच खा. तडस यांच्या स्थानीय विकास निधीतून सुकमा हल्ल्यात शहीद झालेले स्थानीय वीरपुत्र प्रेमदास मेंढे यांच्या पाच लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.केंद्रीय दारूगोळा भांडाराचे लेफ्टनंट कर्नल पंकज शुक्ला, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर, पं.स. उपसभापती किशोर गव्हाळकर, पं.स. सदस्य दिलीप अग्रवाल, पत्रकार प्रभाकर शहाकार, भाजप जिल्हा सचिव नितीन बडगे, ओंकार राऊत, माजी सैनिक रसुलाबादचे सरपंच राजेश सावरकर, वीरपत्नी हर्षदा मेंढे, संतोष तिवारी आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.खासदार तडस म्हणाले ‘एक शिपाई देशासाठी लढतो’ त्यात त्याला जर वीर मरण आले तर त्याचा सन्मानच केला पाहिजे. शहीद प्रेमदास मेंढे यांच्या स्मारकाचा विरोध न करता त्याचे जतन करून त्या स्मारकापासून येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे, असे सांगितले.प्रारंभी शहीद प्रेमदास मेंढे यांच्या स्मारकावर खा. तडस, लेफ्ट. कर्नल शुक्ला यांच्यासह अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता गुंजन मेंढे, राहुल गायकवाड, डॉ. प्रा. सतीश चहांदे, राहुल गायकवाड यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले. संचालन रमेश निंबाळकर यांनी तर आभार लडूदास नितनवरे यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.
शहिदांच्या स्मारकापासून तरूण पिढीला देशभक्तीची प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:33 AM
ऊन, वारा, वादळ पावसाचा मारा सहन करीत देशाचा सैनिक डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करतो म्हणून आपण सुखाची झोप घेतो. सीमेवर सैनिक आहे म्हणून देश सुरक्षित आहे. देशाचे रक्षण करताना तो आपल्या प्राणाची आहुती देतो.
ठळक मुद्देरामदास तडस : नाचणगावात शहीद प्रेमदास मेंढे स्मारकाचे लोकार्पण