शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

१,१०० शेतकऱ्यांना विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:39 PM

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकाचे जिल्ह्यात दरवर्षी नुकसान होते. पीक नुकसानाच्या कालावधीत अत्यंत कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य टिकून राहावे याकरिता शासनाकडून विमा योजना राबविली जाते. शेतकरी या योजनेत सहभागी होत पिकांचा विमा उतरवतात. २०१८-१९ या रब्बी हंगामात जिल्ह्यातील कर्जदार ११००, तर १८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

ठळक मुद्दे१८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश : प्रस्तावासाठी ३१ डिसेंबर ‘डेडलाईन’

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकाचे जिल्ह्यात दरवर्षी नुकसान होते. पीक नुकसानाच्या कालावधीत अत्यंत कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य टिकून राहावे याकरिता शासनाकडून विमा योजना राबविली जाते. शेतकरी या योजनेत सहभागी होत पिकांचा विमा उतरवतात. २०१८-१९ या रब्बी हंगामात जिल्ह्यातील कर्जदार ११००, तर १८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने नापिकीचा सामना करावा लागत आहे. संकटे काही केल्या बळीराजाचा पिच्छा सोडत नाहीत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील अनेक भागात बोंडअळीसह अन्य रोगांनी कहर केला. परिणामी, कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. कित्येक शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन क्विंटल इतके तोकडे उत्पन्न झाले. सोयाबीन पिकाचीही अशीच अवस्था झाली. या पिकांच्या उत्पादनातून मिळालेल्या उत्पन्नातून शेतकरी रब्बी हंगामाकरिता जुळवाजुळव करतो. मात्र, बोंडअळी, रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने डिसेंबरच्या मध्यात जिल्ह्यात आठवडाभर ढगाळ वातावरण होते. दरम्यान पाऊसही कोसळला. यात अनेकांचा कापूस भिजला. हे वातावरण रब्बी हंगामातील पिकांकरिता काही अंशी मारक ठरले. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही हातून जातो की काय, अशी शेतकऱ्यांना धडकी भरली होती.फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात अनेकदा वादळवाऱ्यांसह अवकाळी पावसाचा सामना करावा लागतो. गत काही वर्षांपासून निसर्गचक्र सातत्याने बदलत असल्याने शेतकरी विम्याचे कवच घेतात. २०१८-१९ या वर्षांत जिल्ह्यातील कर्जदार ११०० तर १८ बिगर कर्जदार शेतकºयांनी विम्याचे संरक्षण घेतले. अद्याप बरेच शेतकरी या योजनेत सहभागी झालेले नाहीत. हंगामासाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची मुदत ३१ डिसेंबर असून शेतकºयांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.पिकनिहाय विमा हप्ता दर, रक्कमप्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गहू बागायत आणि हरभरा पिकाकरिता विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या १.५ टक्के निर्धारित करण्यात आलेला आहे. गहू व हरभरा पिकाकरिता प्रति हेक्टर अनुक्रमे ५९९ व ३४६.५० विमा हप्ता रक्कम निश्चित करण्यात आली आहे.मुंबईतील कंपनीची नियुक्तीरब्बी हंगाम २०१८-१९ प्रधानमंत्री पीक विमा योजनेकरिता जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मुंबई येथील भारती एक्सा जनरल इन्शुरन्स या कंपनीची शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.निसर्गचक्र विस्कळीतमानवी चुकांमुळे निसर्गचक्र विस्कळीत झाले आहे. परिणामी अल्प पर्जन्यमान, अवकाळी पाऊस सोबतच कीड, रोगांचा पादुर्भाव याचा शेतपिकांवर परिणाम होतो. यामुळे पीक विमा अत्यावश्यक झाला आहे..जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्चच्यादरम्यान अवकाळी पाऊस, वादळवाºयाची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षी शेतकºयांना नुकसानाला सामोरे जावे लागते. पिकांचे नुकसान टाळण्याकरिता शेतकºयांनी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करीत योजनचा लाभ घ्यावा. यामुळे आर्थिक स्थैर्य टिकण्यास मदत होईल.डॉ. विद्या मानकरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा