शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

वर्धेत लागणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘नम्मा टॉयलेट’; राज्यातील पहिलेच शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 9:32 AM

वर्धा नगर पालिकेअंतर्गत शहरात पाच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नम्मा मॉडेल शौचालय लावण्यात येत आहे. नम्मा शौचालय लावणारे वर्धा हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे.

ठळक मुद्देचार कोटींचा अतिरिक्त निधी दिलासौर उर्जेचा वापर होणार

अभिनय खोपडे ।आॅनलाईन लोकमतवर्धा : वर्धा नगर पालिकेअंतर्गत शहरात पाच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नम्मा मॉडेल शौचालय लावण्यात येत आहे. नम्मा शौचालय लावणारे वर्धा हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने ४ कोटींचा अतिरिक्त निधी वर्धा नगर पालिकेला दिलेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिला. त्यानंतर देशभर स्वच्छता कार्यक्रम लोकचळवळ म्हणून राबविण्यात येऊ लागला. वर्धा शहरात १९ प्रभागात तब्बल तीन महिने दर रविवारी स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. आरोग्य स्वच्छता व कर वसूली या कामात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वर्धा नगर पालिकेला ४ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला. त्यानंतर वर्धा नगर पालिकेच्या आरोग्य विभागाची चमू नम्मा टॉयलेटच्या अवलोकनासाठी चेन्नईला गेली व तेथून पाहून आल्यानंतर शहरात ते लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यातून वर्धा शहरातील ५ ठिकाणी नम्मा टॉयलेट उभारले जाणार आहे. हे काम केंद्र सरकारची मान्यताप्राप्त असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची नम्मा संस्थाच करणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली.तामिळनाडूत यशस्वी झाल्यानंतर राज्यात दाखलनम्मा शौचालयाचे वैशिष्ट्य म्हणे हे युनिव्हर्सल डिझाईन, मॉड्युलर स्टॉल्स, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ऐसपैस जागेची उपलब्धता, स्वच्छतेसाठी मुबलक पाण्याची उपलब्धता, दुर्गंधीमुक्त वातावरणासाठी हवा खेळती राहणे, व सोलर एनर्जीवरून विद्युत व्यवस्था अशी आहेत. सुरूवातीला चेन्नई शहरात प्रायोगिक तत्वावर थांबरम नगर पालिकेने याचा वापर केला.व त्याच्या यशस्वी चाचणीनंतर तामिळनाडू सरकारने २०१३ मध्ये या मॉडेलला अधिकृत मान्यता दिली. आता हे मॉडेल राज्यात वर्धेत पहिल्यांदाच लावण्यात येणार आहे.

नम्मा म्हणजे काय?तामिल भाषेत नम्मा म्हणजे मराठीत ‘माझे’ किंवा इंग्रजी ‘माय’ असा अर्थ आहे. त्या अर्थाने माझे शौचालय असा अर्थबोध होतो. तामिळनाडू सरकारने २०१२ मध्ये हागणदारी मुक्त राज्य करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची बैठक चेन्नई येथे घेतली होती. या तज्ज्ञांमध्ये अहमदाबाद, मुंबई येथील सदस्यांचा समावेश होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या शौचालयांचा अभ्यास करून तसेच तामिळनाडू राज्यातील त्रिची, उटी, कांचीपुरम, चेन्नई व अन्य शहरांचे तीन महिने सर्व्हेक्षण केले व आंतराष्ट्रीय मानकाचे शौचालय मॉडेल तयार केले. त्याला नम्मा हे नाव देण्यात आले.वर्धा हे शहर महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे. या शहरात दररोज १ हजार पर्यटक देशविदेशातून येतात. स्वच्छतेचा सार्वजनिक आदर्श निर्माण व्हावा यासाठी वर्धा शहरात नम्मा शौचालय लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे कंत्राट ई-निविदेमार्फत देण्यात आले आहे. लवकरच शहरात हे शौचालय लावले जातील.अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान