लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील शेतकºयांचे सोयाबीन हे मुख्य पीक आहे. या पिकावर अचानक तांबेºया रोगाने आक्रमण केले आहे. शिवाय व्हायरसने अटॅक केल्याने सोयाबीन पिवळे पडले आहे. दानेही भरले नाहीत. परिणामी, संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.लहरी निसर्गामुळे शेतकºयांवर अस्मानी संकट आले आहे. यातच व्याजाने पैसे घेऊन शेतकºयांनी शेतीचा खर्च केला. यामुळे त्वरित उपाययोजना करीत शेतकºयांना मदत करावी, अशी माणगी जि.प. सदस्य सुचिता कदम यांनी केली आहे. याबाबत संबंधित अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यात १३ हजार ३०५ हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड झाली आहे. यंदाचा पाऊस सोयाबीनकरिता योग्य वेळी आल्याने पिके समाधानकारक होती. सप्टेंबर महिन्यात सोयाबीनची झाडे पल्लवीत झाली होती; पण मागील चार-पाच दिवसांपासून शेतातील हिरवेगार असलेली सोयाबीनची झाडे शेंड्यावर पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहे. रोगांचे आक्रमण तीव्र असल्याने अनेक शेतजमिनी रोगाच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत. यामुळे काही दिवसांतच घरी येणारे सोयाबीनचे पीक जागेवरच उद्ध्वस्त होत असल्याचे दिसते. शिरखेड सर्कलमध्ये देऊरवाडा, नांदपूर, टाकरखेडा, पिपरी, लाडेपूर, खुबगाव, बोरगाव, जळगाव, वर्धमनेरी, बाजारवाडा, टोना, राजापूर, सर्कसपूर, हरिसवाडा या शिवारात पिकांवर अधिक रोग दिसतो. यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी मनीष उभाड यांनी तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाणे यांना निवेदनातून केली आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकºयांनी सहभाग घेतला आहे. शासनाने विमा कंपनी व कृषी विभागाला निर्देशित करीत रोगांची पाहणी करावी व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही जि.प सदस्य कदम, उभाड व शेतकºयांकडून करण्यात आली आहे.रोगट वातावरणामुळे पिकांवर येतेय मरगळमुसळधार पावसाची गरज असताना जिल्ह्यात अत्यल्प पावसाचे आगमण झाले. मागील १५ ते २० दिवसांपासून सातत्याने उन्ह तापत असून ढगाळ वातावरणाची केवळ निर्मिती होते. यामुळे रोगट वातावरणाची निर्मिती होत आहे. यामुळे पिकांवर विविध रोग तसेच अळ्यांचे आक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सोयाबीनवर तांबेरा आणि व्हॉयरसने अटॅक केल्याने त्यावर उपाययोजना करताना शेतकरी त्रस्त आहे. शेतीचा खर्च वाढत असून उत्पादनाची अपेक्षा भंग होणार असल्याचेच चित्र आहे. सोयाबीनचे अद्याप दानेच भरले नसल्याने उत्पादन मिळणार की नाही, याबाबत साशंकताच आहे. शिवाय कपाशीवरही विविध रोगांनी आक्रमण केले आहेत. यामुळे पिकांवरच मरगळ आल्याचे दिसते. कृषी विभाग उपाययोजना सूचवित असले तरी यात खर्च मात्र वाढत आहे.तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे झाडे उपटून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अन्यथा संपूर्ण शेतातील पीक रोगाच्या सपाट्यात येऊ शकते. ट्रायकोडर्मासोबत शेणाचे मिश्रण करून त्याची फवारणी केल्यास या रोगावर नियंत्रण मिळविता येईल.- प्रशांत गुल्हाणे, तालुका कृषी अधिकारी, आर्वी.पाणीटंचाईमुळे पिके वाळण्याच्या मार्गावरपिपरी (पोहणा) - मागील एक महिन्यापासून परिसरात पावसाचा थेंबही नाही. याचा पिकांसह मनुष्यावरही विपरित परिणाम होत आहे. पाण्याअभावी सोयाबीन तथा कपाशी वाळत आहे. दमट वातावरणामुळे चिमुकल्यांना व्हायरल फीव्हरने ग्रासले आहे. विविध आजार डोके वर काढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.वातावरणातील या विचित्र बदलामुळे पिकेत हातची जाणार की काय, अशी भीती शेतकºयांना त्रस्त करीत आहे. सध्या सप्टेंबर महिना सुरू असून सोमवारी जिल्ह्यात काही भागात पावसाचे आगमण झाले; पण पिकांना तथा आजार दूर करण्यासाठी मुसळधार पापसाची गरज आहे.
सोयाबीनवर तांबेरा रोगाचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:53 AM
तालुक्यातील शेतकºयांचे सोयाबीन हे मुख्य पीक आहे. या पिकावर अचानक तांबेºया रोगाने आक्रमण केले आहे. शिवाय व्हायरसने अटॅक केल्याने सोयाबीन पिवळे पडले आहे.
ठळक मुद्देनुकसान भरपाई देण्याची मागणी : जि.प. सदस्याचे प्रशासनाला साकडे