किशोर तेलंग।लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टा.) : येथील शेतकरी विनोद कुंभारे यांचे गावाशेजारी तळेगाव एकुर्ली रस्त्यावर चार एकर शेतात सोयाबीनची लागवड केली; पण ते सोयाबीन पिवळे पडून मरत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय शेतात जवळपास अर्धा-अर्धा एकराचे खळे तयार झाले आहे. परिसरात सोयाबीनची लागवड झालेल्या अनेक शेतात हिच परिस्थिती दिसून येत असल्याने व संपूर्ण पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे हा रोगा असल्याचे काही कृषी व्यवसायिक सांगत आहे. मात्र, याआधी सुद्धा याच शेतात सोयाबीन होते, तेव्हा असे झाले नाही असे शेतकरी कुंभारे यांचे म्हणणे आहे. शेतकरी कुंभारे यांनी सोयाबीन दोन फवारणी केल्या रासायनिक खते सुद्धा दिली. डवरणी झाली, तणनाशक सुद्धा फवारले. त्यामुळे पीक चांगले बहरले; पण या अज्ञात रोगाने सोयाबीन उत्पादकांवर मोठे संकटच आले आहे. सध्या जमिनीत ओलावा आहे. तरी सोयाबीन पिवळे पडत असल्याने शेतकऱ्यांसमोर कुठला रोग आहे याबाबत उलट-सुटल चर्चा होत आहे. ही परिस्थिती नेमकी अशामुळे ओढावली याचा साधा अंदाजही शेतकºयांना सध्या बांधता येत नसल्याचे शेतकरी सांगतात. यावर उपाययोजना म्हणून काय करावे, याची माहिती पीक पाहणी करून कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आहे.कपाशीवरही आला चुरडाया भागातील कपाशी व तूर ही पीक बºयापैकी असल्याचे दिसून येत असली तरी कपाशी पिकांवर चुरडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे महागडी औषधे खरेदी करून त्याची फवारणी कपाशी पिकावर केल्या जात आहे. या प्रकारामुळे यंदाही उत्पादन खर्चात वाढ होत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यातच कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अस्मानी व सुल्तानी संकटांनी शेतकरी पुरता धास्तावला आहे.मी सोयाबीन पिकाची योग्य निगा राखली. औषध फवारले, वेळेवर खत दिले, डवरणी केली सर्व कामे वेळीच केल्याने पीकही चांगले बहरले होते. परंतु, अचानक पीक पिवळे होत करपल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर रोग कुठला याबाबत कृषी विभागाने आम्हाला सांगत त्यावरील उपाययोजनांची माहिती द्यावी.- विनोद कुंभारे, शेतकरी, तळेगाव (टा.).
सोयाबीनवर अज्ञात रोगाचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 11:39 PM
येथील शेतकरी विनोद कुंभारे यांचे गावाशेजारी तळेगाव एकुर्ली रस्त्यावर चार एकर शेतात सोयाबीनची लागवड केली; पण ते सोयाबीन पिवळे पडून मरत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय शेतात जवळपास अर्धा-अर्धा एकराचे खळे तयार झाले आहे.
ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची कास्तकारांची मागणी