वर्धा : बोर्डाच्या पेपर फुटीप्रकरणी वर्धा शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून वर्ध्यातील पोलीस शिपायाला अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीच्या शोधात परभणीला गेलेल्या शहर पोलिसांच्या पथकाला रविवारी सायंकाळपर्यंततो सापडला नसल्याची माहिती एसडीपीओ माधव पडिले यांनी दिली. या प्रकरणात वर्ध्यातील मुख्यालयात कार्यरत पोलीस शिपाई अजीत सोर याला अटक करण्यात आली. यातील मुख्य आरोपी असलेल्या परभणी येथील अशोक धरणे या पोलीस शिपायाला अटक करण्यासाठी शनिवारी वर्धा पोलिसांची चमू परभणीसाठी रवाना झाली होती. मात्र तो सापडला नव्हता.
परभणीमध्ये आरोपी पोलिसाचा शोध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 4:25 AM