शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
2
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
3
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
4
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
5
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
6
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
7
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
8
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
9
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
10
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
11
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
12
Bhai Dooj 2024: बहिणीला ओवाळणीत काय भेटवस्तू द्यावी याचा विचार करताय? हे वाचाच!
13
'पाडव्याला नवऱ्याने स्तुती केल्यावर...'; अविनाश-ऐश्वर्या नारकर यांचा नवीन रील व्हिडीओ चर्चेत
14
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
15
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
16
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
17
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
18
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
19
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
20
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

साडेचार कोटी लुटले; चौघे पाच तासांत कोठडीत गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 12:23 PM

महामार्गावरील सशस्त्र दरोड्याचा छडा : चौघांना सहा दिवस कोठडी, पाचव्या संशयिताला अटक

वर्धा : महामार्गावर सशस्त्र दरोडा टाकून ४ कोटी ५२ लाखांची रक्कम लुटणाऱ्या चार आरोपींना वर्धा पोलिसांनी अवघ्या पाच तासांच्या आत नागपूर येथून अटक करीत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, तसेच ३ कोटी २६ लाखांची रक्कम रिकव्हर केली. चारही आरोपींना १३ रोजीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला असून, पाचव्या आरोपीस ९ रोजी नागपूर येथून अटक केल्याचे पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी सांगितले.

ब्रिजपालसिंग ठाकूर, आदिल शेख, दिनेश वासनिक, इशू स्वामी व रणजित वाघमारे, अशी अटक आरोपींची नावे असून, त्यांना १३ पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे, तर ९ रोजी अटक केलेल्या आरोपीचे नाव राजा बुंदेले असे आहे. अठेसिंग भगवान सोळंके, रा. चानसभा, जि. पाटण राज्य गुजरात हा गुजरात येथील कमलेश शाह यांच्याकडे चालक म्हणून कामावर होता. तो सध्या तीन महिन्यांपासून नागपूर येथील कार्यालयात चालक म्हणून काम करीत होता.

कमलेश शाह यांच्या सांगण्यावरून त्याने नागपूर येथील कार्यालयातून विनीत जोशी यांच्याकडून ४ कोटी ५२ लाखांची रक्कम घेऊन अरविंद पटेल याच्यासह हैदराबादकडे जाण्यासाठी निघाला. दरम्यान, वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोहणा परिसरातून गेलेल्या महमार्गावर पाठीमागून लाल दिवा लावलेली एक पांढऱ्या रंगाची कार सायरन वाजवत आली कारला अडवून अठेसिंग व अरविंदला मागे बसवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्यांच्या गाडीत असलेली ४ कोटी ५२ लाखांची रक्कम घेत लाल रंगाच्या कारसह पलायन केले होते. आरोपीपैकी एकाने अठेसिंगच्या डोक्यावर बंदूक लावून त्यास जिवे मारण्याची धमकीही दिली होती.

पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांना याची माहिती मिळताच त्यांनी अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी ८ रोजी रात्रीच्या सुमारास वडनेर पोलिस ठाणे गाठून घटनास्थळाची पाहणी करीत तत्काळ विविध पोलिस पथके रवाना केली. अखेर पोलिसांनी नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण येथून चार आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि ३ कोटी २६ लाख, असा एकूण ३ कोटी ४६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सहा. पोलिस निरीक्षक संदीप कापडे, संतोष दरेकर, दीपक वानखेडे, संदीप गाडे, पोलिस निरीक्षक संजय मिश्रा, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, हमीद शेख, संतोष दरगुडे, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले व सायबर सेलचे दिनेश बोथकर, नीलेश कट्टोजवार, विशाल मडावी, अंकित जिभे यांनी केली.

१५ पथकांची मेहनत अन् मिळाले यश

पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखा, वडनेर पोलिस ठाणे, हिंगणघाट पोलिस ठाणे, विशेष पथक, सायबर पथक, असे एकूण १०० अधिकारी व अंमलदार यांचा सहभाग असलेली तब्बल १५ पथके तयार करून त्यांना सूचना देत वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, चंद्रपूर, नागपूर आदी विविध जिल्ह्यांत पाठविण्यात आले होते. अखेर पोलिसांच्या मेहनतीचे फळ मिळाले असून, आरोपींना अटक करण्यात यश मिळाले.

घटनेबद्दल विशेष पोलिस महानिरीक्षकांनीही केले अलर्ट

गुन्ह्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्राचे छेरिंग दोरजे यांना देण्यात आली होती. त्यांनी तत्काळ नागपूर, अमरावती, यवतमाळ येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन मागत मदत प्राप्त केली. लगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये नाकाबंदी लावण्यात आली होती. यासाठी पोलिस पथकाची चांगलीच कसरत झाली.

मुख्य आरोपी ब्रिजपालला सर्वांत पहिले नागपुरातून केली अटक

तांत्रिक माहिती व गुन्ह्यांच्या तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली कार आणि मुख्य आरोपी ब्रिजपाल सिंग ठाकूर हा नागपूर येथे असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यासह तपास पथकांनी तत्काळ नागपूर गाठून नागपूर गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदारांच्या मदतीने मुख्य आरोपी ब्रिजपालसिंग ठाकूर याला शिताफीने अटक केली. त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून इतर आरोपींचा सुगावा लागला. त्यावरून आरोपी आदिल शेख, दिनेश वासनिक, इशू स्वामी व रणजित वाघमारे यांना नागपुरातील विविध ठिकाणाहून अटक करण्यात आली, तसेच गुन्ह्यात वापरलेली एम.एच. ३१ ई.क्यू. ०९०९ क्रमांकाची कार जप्त केली.

कार केली यवतमाळ जिल्ह्यातून जप्त

आरोपींनी अठेसिंग चालवत असलेली कार यवतमाळ जिल्ह्यातील वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याकडेला सोडून पळ काढला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जात लाल रंगाची कार हस्तगत केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली तपासात मदत

गुन्ह्याच्या तपासात नागपूर शहराचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत जयंत नाईकनवरे, नागपूर ग्रामीणचे पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा व पोलिस उपआयुक्त परिमंडळ २ नागपूर शहर यांनी तपासात मदत केली.

५० हजारांचा रिवॉर्ड जाहीर...

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी, तसेच विशेष पथकांनी रात्रभर डोळ्यात तेल ओतून आरोपींचा शोध घेतला. रेल्वेस्थानकं, एअरपोर्टची तपासणी करून हॉटेल्स, ढाबे, तसेच सीसीटीव्हीची तपासणी करून आरोपींना अटक केली. विदर्भात आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे डिटेक्शन असून, रिकव्हरीही मोठी असल्याने पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी तपासी पथकांना ५० हजार रुपयांचे रिवॉर्ड जाहीर केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकRobberyचोरीwardha-acवर्धा