शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

लोंबकळणाऱ्या वीजतारा देतात अपघाताला निमंत्रण

By admin | Published: May 30, 2017 1:08 AM

सध्या शेतीच्या मशागतीचे कामे अंतिमटप्प्यात आहे. मात्र शेतातून जाणाऱ्या वीज तारांमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो.

शेतीची कामे करताना अडचण : वीज खांबांना ताण देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सध्या शेतीच्या मशागतीचे कामे अंतिमटप्प्यात आहे. मात्र शेतातून जाणाऱ्या वीज तारांमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. शेतशिवारात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.सेलू शिवारातील शेत सर्व्हे नं. २५६ मध्ये गत काही महिन्यांपासून विद्युत तारा लोंबकळत आहे. शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करताना त्या तारा अडचणीच्या ठरत आहे. अनेक वेळा शेतकरी अनिल काटोले यांनी वीज वितरण कार्यालयाला कळविले असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या जिवंत तारा अपघातास कारणीभुत ठरण्याचा धोका अधिक आहे. शेतात काम करताना शेतकरी मजूर जीव मुठीत घेऊन काम करीत आहे.असाच प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. शेतातील तक्रारीचा निपटारा करण्यास टाळाटाळ का केली जाते हे मात्र न उलगडणारे कोडे आहे. बहुतांश ठिकाणी नवीन वीज जोडणीला सिमेंटचे खांब वापरले जात आहे. हे खांब काही ठिकाणी जमिनीला टेकत आहे. तर कुठे तारांच्या आधारे उभे आहे. शेतात दिवसाची रात्र करणाऱ्या शेतकऱ्याला अडचणीचे ठरू पाहत आहे. अनिल काटोले यांचे शेतातून वडगावकडे वीज पुरवठा करणारे खांब गेले आहे. त्यामुळे वीज खांबांना तंगावा देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकाचे नुकसान होवू नये तसेच वारागर्दीमुळे तार तुटल्यास अपघात घडू नये यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी अनिल काटोले तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. याची दखल घेत त्वरीत उपाययओजना करण्याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. वीजखांब वाकल्याने तारा लोंबकळल्या सेवाग्राम : आदर्श नगर येथील वीज खांब वाकल्याने तारा लोंबकळल्या आहे. पाऊस व वादळामुळे लोंबकळ्त्या तारांमध्ये घर्षण होऊन धोक्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.सेवाग्राम-वर्धा मार्गावर असलेल्या आदर्शनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुचा खांब वाकला आहे. शिवाय काही तारा खाली लोंबकळत आहे. वाकलेल्या वीज खांबाला तंगाव्याचा आधार नाही. यामुळे आदर्शनगर वसाहत आणि हुतात्मा स्मारकाकडे गेलेल्या वीज तारा लोंबकळलेल्या स्थितीत आहे. येथील वीज जोडणी जुनी आहे. रस्त्याचे बांधकाम झाल्याने उंची वाढली आहे. परिणामी रस्ता आणि वीजतारा यातील अंतर कमी झाले आहे. वाहन चालकांसाठी ही बाब धोकादायक ठरत आहे. वादळामुळे येथे अपघताची शक्यता निर्माण झाली आहे. येथील धोका लक्षात घेता वाकलेला वीज खांब व्यवस्थित करण्याची मागणी होत आहे.