लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरांगणा ठाण्यांतर्गत येणाऱ्या मादापूर-दानापूर शिवारातून लोखंडी प्लेटांची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या दोन चोरट्यांना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दहा लोखंडी प्लेटा व मालवाहू, असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनेश मारोतराव इंगळे (३२) व मनोज भीमराव उईके (२५) दोन्ही रा. पिंपळखुटा, असे अटकेतील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरात चोरीचे लोखंडी साहित्य विक्रीकरिता आणले जात असल्याची गोपनीय माहिती सेवाग्राम पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी करून काही मालवाहू वाहनांची पाहणी केली असता एमएच ३२ क्यू ३५५४ क्रमांकाच्या मालवाहूत शासकीय योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेटा आढळून आल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर लोखंडी प्लेटा चोरी करून आणल्याचे समोर आले. यावरून दिनेश इंगळे व मनोज उईके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मालवाहू तथा दहा लोखंडी प्लेटा, असा एकूण सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनात ठाणेदार राजू मेंढे यांच्यासह सेवाग्राम पोलिसांनी केली.
लोखंडी प्लेट चोरणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:43 PM
खरांगणा ठाण्यांतर्गत येणाऱ्या मादापूर-दानापूर शिवारातून लोखंडी प्लेटांची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या दोन चोरट्यांना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दहा लोखंडी प्लेटा व मालवाहू, असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ठळक मुद्देसेवाग्राम पोलिसांची कारवाई : मालवाहूसह मुद्देमाल जप्त