लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंचन क्षेत्रात व गंगा नदी स्वच्छतेतही मोठा सकारात्मक बदल होणार आहे. कामे वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास खा. रामदास तडस यांनी व्यक्त केला.केंद्रीय रस्ते परिवहन व महागार्म मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नव्याने जलसंधारण, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. याबद्दल खा. तडस यांनी नागपूर निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी मतदार संघातील महामार्ग विकास कामे, केंद्रीय मार्ग निधी योजनेतील कामे, सिंदी रेल्वे येथील ड्रायपोर्ट तथा केंद्र शासन पुरस्कृत निम्न वर्धा सिंचन प्रकल्प आदी विषयावर चर्चा झाली. महामार्ग क्षेत्रात शिंपींग मंत्रालयातर्फे गडकरी यांच्या नेतृत्वात विकास झाला. ती गती सिंचन क्षेत्रात दिसेल, असे गडकरींनी सांगितले.
सिंचन क्षेत्राचा विकास होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 11:29 PM
सिंचन क्षेत्रात व गंगा नदी स्वच्छतेतही मोठा सकारात्मक बदल होणार आहे. कामे वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास खा. रामदास तडस यांनी व्यक्त केला.
ठळक मुद्देरामदास तडस : नितीन गडकरींची घेतली भेट