शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

दक्षता बाळगल्यास विद्युत अपघात कमी करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:32 PM

विजेचे आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ‘विजेशिवाय जनजीवन’ याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

ठळक मुद्देरामदास तडस : विद्युत सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ

आॅनलाईन लोकमतवर्धा : विजेचे आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ‘विजेशिवाय जनजीवन’ याची आपण कल्पनाही करू शकत नाही. कारण, इलेक्ट्रीसिटी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. सामान्य लोकांचे जनजीवन सुरक्षित राहावे यासाठी विजेचा सुरक्षितरित्या वापर होणे गरजेचे आहे. सामान्य ग्राहक, शेतकरी, विद्यार्थी यांच्यात विजेच्या वापराबाबत जनजागृती तसेच दक्षता बाळगल्यास विजेचे अपघात कमी करणे शक्य आहे. हे जनतेपर्यंत पोहोचविणे विद्युत सुरक्षा सप्ताहाचा उद्देश आहे, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.महावितरण व विद्युत निरीक्षक कार्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १८ जानेवारीपर्यंत विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरक्षा रॅली, शाळा, महाविद्यालयांत विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण सप्ताहाचा शुभारंभ महावितरणच्या सभागृहात खा. रामदास तडस यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता सुनील देशापांडे होते. कार्यक्रमानंतर शहरातून काढलेल्या वीज सुरक्षा रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.खा. तडस पूढे म्हणाले की, आता दररोज बाजारात नवनवीन विद्युत उपकरणे येत आहेत. आपले जीवन अधिक सुखकर व्हावे म्हणून या उपकरणांचा आपण अधिकाधिक वापर करीत आहोत. तथापि, विद्युत उपकरणांची योग्यरित्या हाताळणी न केल्याने विद्युत अपघाताने जीवितहानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. विद्युत अपघातामुळे बरीच कुटुंबे उद्ध्वस्त होतात. अनेक लोक विद्युत उपकरणे हाताळताना अतिउत्साह दाखवतात व अपघात घडतात. याचे प्रमाण आज इतके वाढले की, याबाबत खरोखर लोकांना जागृत करणे अत्यावश्यक झाले आहे. या अतिउत्साहात अगदी निष्णात लोकही हातात रबरी ग्लोव्हज घालणे, पायात सेफ्टी शूज वापरणे इतकेच काय तर विद्युत पुरवठा बंद करून काम करणे आदी लहान उपायही करीत नसल्याने जीवितहानी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. वास्तविक, हॅन्ड ग्लोव्हज वा सेफ्टी शूज घालायला १० ते १५ सेकंद लागतात; पण ते न केल्याने एक जीव गमवावा लागला तर मागे उरलेल्या कुटुंबाने कुणाच्या आधारावर जगायचे, हा प्रश्न पडतो. सुरक्षेचे उपाय हे केवळ आपल्यासाठी नसून आपल्याशी निगडीत प्रत्येक घटकासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.विद्युत सुरक्षा सप्ताह शुभारंभ कार्यक्रमात महावितरण आणि विद्युत निरीक्षक कार्यालयाच्यावतीने उपस्थित नागरिक तथा कर्मचाºयांना पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशन दाखवून विविध ठिकाणी होणाºया अपघातांना कसे टाळता येईल, याबाबत सखोल चित्रमय मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्युत निरीक्षक अविनाश वनारकर यांनी केले. याप्रसंगी वर्धा जिल्ह्यातील महावितरणच्या तीनही विभागातील कार्यकारी अभियंता उत्तम उरकुडे, निलेश गायकवाड, हेमंत पावडे तसेच इतर अभियंते, विद्युत निरीक्षक, कार्यालयातील सर्व अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जागरुकतेशिवाय हानी थांबविणे अशक्य -देशपांडेकितीही कायदे केले, कडक नियम लावले आणि कठोर शासन केले तरी जोपर्यंत आपण याबाबत जागरुक होत नाही, तोपर्यंत आपण होणारी हानी थांबवू शकत नाही. तेव्हा प्रत्येकाने कसोशीने नियम व निकष पाळा आणि विद्युत अपघात टाळा, हाच आपला मूलमंत्र आहे. विद्युत सुरक्षा सप्ताहातील जनजागृतीमुळे विद्युत उपकरणे निष्काळजीपणे हाताळल्याने वाढलेले अपघात निश्चितपणे कमी होऊ शकतात, असा विश्वास अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांनी व्यक्त केला.