शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

ब्राह्मणवाड्यात छाव्यांना ‘हंटर ट्रेनिंग’ देणारी कॅटरीना नव्हेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 5:00 AM

अवथळे नामक पशुपालकाच्या मालकीची गाय २१ फेब्रुवारीला पट्टेदार वाघाने मारल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. त्यानंतर गाईचा फडशा पाडणारा वाघ की बिबट याची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी आर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांनी वरिष्ठा मार्गदर्शनात ब्राह्मणवाडा परिसरात सुरूवातीला चार ट्रॅप कॅमेरे लावले. याच कॅमेऱ्यात एक प्रौढ वाघिण तिच्या सुमारे १२ ते १४ महिन्यांच्या दोन छाव्यांसह कैद झाली.

ठळक मुद्देवाघिणीसह छावे ट्रॅप कॅमेरात कैद : आता ढगा भुवनकडे वळविला मोर्चा

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी वनपरिक्षेत्रातील ब्राह्मणवाडा जंगल परिसरासह शेत शिवारात पाळीव जनावरांचा फडशा पारणारी बोर व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-३ कॅटरीना नामक वाघिण असल्याचा तसेच ती तिच्या दोन छाव्यांना शिकारीचे प्रशिक्षण देत असल्याचा कयास काही वन्यजीव प्रेमींकडून लावल्या जात होता. पण पाच ते सहा दिवसांपूर्वीच कॅटरीनाचे दर्शन बोर व्याघ्र प्रकल्पात झाल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितल्याने ही वाघिण नेमकी कोण व कुठली याबाबतची माहिती वनविभाग गोळा करीत आहे. विशेष म्हणजे सध्या या वाघिणीने आपल्या दोन छाव्यांसह ढगा भुवनकडे आपला मोर्चा वळविल्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनीही दक्ष राहून उन्हाळवाहीची कामे करण्याची गरज आहे.प्राप्त माहितीनुसार, अवथळे नामक पशुपालकाच्या मालकीची गाय २१ फेब्रुवारीला पट्टेदार वाघाने मारल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. त्यानंतर गाईचा फडशा पाडणारा वाघ की बिबट याची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी आर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांनी वरिष्ठा मार्गदर्शनात ब्राह्मणवाडा परिसरात सुरूवातीला चार ट्रॅप कॅमेरे लावले. याच कॅमेऱ्यात एक प्रौढ वाघिण तिच्या सुमारे १२ ते १४ महिन्यांच्या दोन छाव्यांसह कैद झाली. त्यामुळे ब्राह्मणवाडा जंगल शिवारात वाघाचा मुक्त संचार होत असल्याची इत्यंभूत माहितीही वनविभागाला प्राप्त झाली. खबरदारीचा उपाय तसेच या वाघिणीसह तिच्या दोन्ही छाव्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी वनविभागाने एकूण १६ ट्रॅप कॅमेरे या भागात आवश्यक ठिकाणी लावले होते. ब्राह्मणवाडा शिवारात काही दिवस राहिलेल्या या वाघिणीचा बारकाईने अभ्यास केल्यावर ही बाघिण आपल्या छाव्यांना सुरक्षित ठिकाण असलेल्या परिसरात शिकारीचे प्रशिक्षण देत असल्याचेही वनविभागाच्या निदर्शनास आले आहे. असे असले तरी या वाघिणीने आपल्या छाव्यांसह सध्या ढगा भुवन जंगल परिसराकडे आपला मोर्चा वळविल्याचे सांगण्यात येते. 

पट्टेदार वाघाने गाईची शिकार केल्याची माहिती मिळाल्यावर सुरूवातीला चार तर नंतर एकूण १६ ट्रॅप कॅमेरे आवश्यक ठिकाणी लावण्यात आले. ट्रॅप कॅमेरात एक प्रौढ वाघिण दोन छावे कैद झाल्यावर आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी काय दक्षता घ्यावी, याची माहिती ग्रामस्थांना दिली. सध्या या वाघिणीने आपला मोर्चा ढगा भुवन जंगल परिसराकडे वळविला आहे.- नितीन जाधव,  वनपरिक्षेत्र अधिकारी, आर्वी.

 

टॅग्स :Tigerवाघ