वर्धा: गांधीजींचा आमच्या राज्याशी जवळचा संबंध राहिला आहे.ते दोनदा आले.आमचा परिवारही गांधी विनोबांच्या विचारांचा असून वडिल सर्वोदयी होते. गांधीजींच्या १५०व्या जयंती पर्वावर त्यांच्या विचारांप्रमाणे विविध योजना तयार करून राज्यात अमलात आणल्या आहे.यातून ग्रामस्वावंलबनातून विकास,रोजगार उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्याने ते परत घेणे सरकारची जबाबदारी आहे. आता तर सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा निर्णय दिलेला असल्याचे मत छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पत्रकारांशी चर्चा करतांना व्यक्त केले.
प्रसिद्ध महात्मा गांधीजींच्या आश्रमाला मुख्यमंत्री बघेल यांनी भेट दिली.त्यांच्या सोबत छत्तीसगढ कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम, उपाध्यक्ष गिरीश देवांगण,कोषाध्यक्ष रामगोपाल अग्रवाल,प्रदीप शर्मा इ.उपस्थित होते.ते नयी तालिम समिती परिसरात सुरू असलेल्या कांग्रेसच्या अहिंसाके रास्ते या सुरू असलेल्या शिबिरातील चर्चा सत्रात सहभागी होण्यासाठी ते आले होते. मुख्यमंत्री बघेल यांनी सांगितले आमच्या परिवारात स्वातंत्र सैनिक असल्याने परिवार गांधी विनोबांच्या विचारांशी जुळलेला आहे.येवढेच नाही तर छत्तीसगढ जनतेशी जिवाळ्यांचे संबंध आहेत.महिलांच्या पुढाकाराने सरकारने जैविक शेतीसाठी पुढाकार घेतला असून यात सरकार शेतकऱ्यांकडून शेणखत विकत घेऊन गांडूळ खते बणवून त्याचा उपयोग शेतीसाठी करण्यात येत आहेत.यामुळे रासायनिक खतांपासून होणाऱ्या दुष्परिणामाल आळा बसेल.यातून गाव स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे सांगितले.
नक्षलवादी बाबत ते म्हणाले शांती,अहिंसेला विकल्प नाही.गांधीजींचा मार्ग आपल्या समोर आहे.हिंसेला लोकं कंटाळले आहेत.आम्ही विकासाकरीत जमिन देणे,तेंदूपत्त्याला अधिक भाव देणे,कोडूकुटका याला समर्थन यामुळे रोजगार उपलब्ध होत असल्याने जनतेचा विश्र्वास आम्ही जिंकून घेतला.मागील सरकारपेक्षा दोनच वर्षांत वातावरण बदलले आहे. शेतकरी आंदोलनाला बाबत विचारले असता शेतकऱ्यांना कायदे मान्य नसल्याने ते मागे घेतले पाहिजे.देशातील मोठमोठे उद्योग सरकार विकत आहेत.आता लक्ष शेतकऱ्यांच्या जमिनीकडे लागले आहेत.हे सर्व पुंजीवाद्या़साठी होत असल्याची टिकाही बघेल यांनी केली.शेवटी कांग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत विचारले असता अध्यक्ष सोनिया गांधी आहेत.पुढे पसंती मात्र राहुल गांधी यांना राहिल असे त्यांनी सांगितले.
आश्रमात आगमण होताच सूतमाळ आणि पुस्तक देऊन मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे स्वागत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री मुकुंद मस्के यांनी केले.तसेच सरपंच रोशना जामलेकर यांनी सुध्दा सर्वात केले.मार्गदर्शिका अश्विनी बघेल यांनी आदी निवास,बा कुटी,आखरी निवास,बापू कुटी,बापू दप्तर इ.ची माहिती तसेच इतिहास सांगितला.बापू कुटीत सर्वधर्म प्रार्थना झाली.
गांधीजींनी लावलेल्या १९३६ मधील पिंपळ वृक्षाला पाणी घातले.बापू कुटी परिसरातील दानपेटीत ५ हजार रूपये टाकले. नोंदवहीत त्यांनी अभिप्राय लिहिला. आश्रमचे संचालक अविनाश काकडे,शोभा कवाडकर,कार्यालय मंत्री सिध्देश्वर उंबरकर,मार्गदर्शिका संगिता चव्हाण, दीपाली उंबरकर तसेच रूपाली उगले, नामदेव ढोले,आकाश लोखंडे,विजय धुमाळे, रामेश्वर गाखरे, सचिन हुडे,प्रशांत ताकसांडे इ.कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, सेवाग्राम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कांचन पांडे सुध्दा हजर होते.