शासन निर्णय निर्गमित : रामदास तडस यांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आगामी 2019 मध्ये राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती, राष्ट्रीयदिनाचे कार्यक्रम मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरे करण्याकरिता राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ डिसेंबर २०१८ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. या परिपत्रकात महाराष्ट्राचे थोर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री. जगनाडे महाराज जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी साजरी करण्याकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात संत श्री. जगनाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिली.जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मंत्रालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी करण्यात यावी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य तैलिक महासभाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात ऊजामंत्री चंद्रशेखर बावणकुळै, आमदार शिरीष चौधरी, आमदार कृष्णा खोपडे, चरण वाघमारे, हिराकाका चौैधरी, अशोक व्यवहारे, आर.टी. अण्णा चौैधरी, गजूनाना शेलार, भूषण कर्डिले, पोपटराव गवळी, मनोहरसेठ सिंगारे, विक्रांत चांदवडकर, अनिल चैधरी, विजय चौधरी व समाजाचे राज्यातील जिल्हाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याबाबत आश्वासन दिले होते.संत जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय पद्धतीने साजरी करण्यात येणार असल्याने त्यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास खासदार तडस यावेळी व्यक्त केला. सरकारने बहुप्रलंबित निर्णय घेतल्याबद्दल खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
शासकीयस्तरावर साजरी होणार जगनाडे महाराज जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:32 PM