शनिवारी श्री रामांचा जन्म दिन रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली़ यानिमित्त शहरात विविध श्री राम मंदिरांतून श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली़ प्रभू रामांच्या मूर्तीसह विविध देवादिकांच्या मूर्ती शोभायात्रेत सहभागी करण्यात आल्या़ लेझीम नृत्य, बंजारा नृत्य, भजनी मंडळे, श्रीरामांच्या वेशात अश्वारूढ चिमुकले, कुठे डीजे तर कुठे ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेने शहर दुमदुमले होते़ शोभायात्रेत सहभागी भाविकांकरिता शहरात अनेक ठिकाणी लंगरचीही व्यवस्था करण्यात आली होती़
जय श्रीरामाचा गजर...
By admin | Published: March 29, 2015 2:09 AM