शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

ज्वारीविना हुरडा पार्टी इतिहासजमा

By admin | Published: December 27, 2014 10:55 PM

हिवाळा सुरू झाला की पूर्वी ग्रामीण भागातील सर्वांना हुरडा पार्टीची चाहुल लागायची. गुलाबी आणि कुडकडणाऱ्या थंडीत शेतात शेकोटी पेटवून मोठ्या हिरव्या ज्वारीच्या कणसाचा हुरडा भाजून खाण्यात

वर्धा : हिवाळा सुरू झाला की पूर्वी ग्रामीण भागातील सर्वांना हुरडा पार्टीची चाहुल लागायची. गुलाबी आणि कुडकडणाऱ्या थंडीत शेतात शेकोटी पेटवून मोठ्या हिरव्या ज्वारीच्या कणसाचा हुरडा भाजून खाण्यात वेगळीच मौज असायची. परंतु आता जिल्ह्यात ज्वारीचे उत्पन्नच नाममात्र झाल्याने हिवाळ्यातील हुरडा पार्टी इतिहासजमा झाल्याचे चित्र आहे.काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. ज्वारीची कणसं डौलानं शेतात डोलायची. पोळा ते दसरा या दरम्यान ज्वारीची पेरणी व्हायची. चविष्ट व कुरकुरीत भाकरी देणारी पौष्टिक ज्वारी म्हणून तिची ओळख होती. परंतु भाकरीपेक्षाही हिरवी ज्वारी हुरड्यासाठी अत्यंत प्रसिद्ध होती. ऐन हिवाळ्याच्या दिवसात या ज्वारीचा हुरडा व्हायचा. ग्रामीण भागात हुरडा म्हटले की सगळयांच्याच तोंडाला पाणी सुटायचे. शेतकऱ्याचा ‘रानमेवा’ म्हणून हुरड्याची ओळख होती. एक चवदार, गोड, पौष्टिक आणि शरीरवर्धक पदार्थ म्हणून याकडे बघितले जायचे. शेतातील ज्वारीचा हुरडा झाला की, सकाळ, सायंकाळी शेत माणसांनी फुलून जात असत. चार-दोन माणसे जमली की शेतात शेकोटी पेटवायची, १०-२० टपोरे कणसं काढायचे आणि लालबुंद विस्तवावर भाजायची. निखाऱ्यात भाजलेली कणसे तरटावर किंवा हातावर चोळायची आणि मस्त ताव मारायचा. सोबत तोंडी लावायला प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या भाजलेल्या, लाल लसणी चटणी, दही, गुळ आदींची चव असायची. अशा लज्जतदार हुरडा मेजवानीची मजा काही वेगळीच असल्याने शेजारी, मित्र मंडळी, सोयरे हायरे मोठ्या संख्येने हुरडा खाण्यासाठी यायचे. परंतु सध्यस्थितीत जिल्ह्यात हिरवी ज्वारी नजरेसही सापडत नाही. ग्रामीण भागात काहीच शेतकरी घरी चवीला ज्वारी व्हावी आणि जनावरांसाठी कडबा मिळावा म्हणून ज्वारी पेरतात. विज्ञानाच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात शेती करण्यात स्पर्धा सुरू झाली आहे. लोकसंख्या वाढीचा विचार करता जास्त उत्पन्न तेही कमी काळात देणारे संकरीत वाण विकसित झाली आहे. त्यातही जिल्ह्यात ज्वारीचे पीक घेणेचे जवळजवळ बंद झाले आहे. फारच थोडे शेतकरी घरच्यापुरती ज्वारी पेरतात.(शहर प्रतिनिधी)