लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : येथील नगरपंचायतमध्ये गुरुवारी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी विरोधी गटाच्या उमेदवारांने माघार घेतल्यामुळे जयश्री नरेंद्र मोकदम या नगराध्यक्षपदी अविरोध निवडूण आल्या. कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला.आष्टी नगरपंचायत झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत काँगे्रसने एकूण १७ पैकी ११ जागांवर विजय मिळविला. यावेळी पहिल्या अडीच वर्षाकरिता मीरा येणुरकर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. आमदार अमर काळे यांनी सर्वांना समान न्याय देत नंतरच्या अडीच वर्षापैकी एक वर्ष अनिता भातकुलकर यांना नगराध्यक्षपद देण्यात आले. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर उर्वरीत दीड वर्षाकरिता जयश्री मोकदम यांना नगराध्यक्षपद देण्याचे ठरविले. त्यानुसार गुरुवारी नगरपंचायतमध्ये दुपारी १ वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी मोकदम यांच्या विरोधात अजय लेकुरवाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नंतर लेकुरवाळे यांनी अर्ज मागे घेतल्याने जयश्री मोकद्दम अविरोध निवडूण आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार आशिष वानखडे आणि कार्यक्रम अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी आंधारे यांनी जबाबदारी सांभाळली. विजयानंतर गावातून मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नवनिर्वाचित नरागध्यक्षांचे उपसरपंच, सर्व नगरसेवक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.अरुण बाजारे, माजी उपसभापती साहेबखाँ पठाण, संजय शिरभाते,डॉ. प्रदीप राणे, मनोहर येणुरकर, नरेंद्र मोकद्दम, शेखर भातकुलकर, रवींद्र गंजीवाले, हमिदखाँ, प्रतिक माणिकपुरे, मनोज मोकद्दम यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. नगराध्यक्षा जयश्री मोकद्दम यांनी निवडीबद्दल आमदार अमर काळे यांची कृतज्ञता व्यक्त केली.
आष्टीच्या नगराध्यक्षपदी जयश्री मोकदम अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:22 PM
येथील नगरपंचायतमध्ये गुरुवारी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी विरोधी गटाच्या उमेदवारांने माघार घेतल्यामुळे जयश्री नरेंद्र मोकदम या नगराध्यक्षपदी अविरोध निवडूण आल्या. कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला.
ठळक मुद्देविरोधी गटाच्या उमेदवाराची माघार : मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी केला जल्लोष