लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक न.प.च्यावतीने विशेष मोहीम हाती घेवून शहर विकासाच्या कामात अडथळा निर्माण होणारे धार्मिक स्थळे हटविण्याचे काम केले जात आहे. सदर मोहिमेच्या चौथ्या दिवशी न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागातील १२ धार्मिक स्थळे हटविली. गत पाच दिवसांपैकी चार दिवस राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल ६३ धार्मिक स्थळे हटविल्याचे सांगण्यात आले.न.प.ने दिलेल्या लेखी सुचनांकडे पाठ केल्याने शुक्रवारपासून न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी १९, दुसऱ्या दिवशी १७, तिसऱ्या दिवशी १५ तर राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या चौथ्या दिवशी सायंकाळी उशीरापर्यंत १२ धर्मिक स्थळे हटविण्यात आली. मंगळवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील मालगुजारीपुरा, ठाकरे मार्केट, महादेवपुरा, मुख्य बाजारपेठ व शिवनगर परिसरातील अतिक्रमण करून बांधण्यात आलेली सुमारे १२ धार्मिक स्थळे जेसीबीच्या सहाय्याने पाडली. ही कारवाई मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनात प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, सुधीर फरसोले, अशोक वाघ, दिनेश नेरकर, सतीश जाधव, प्रविण बोरकर, रवी जगताप, चेतन खंडारे, चेतन कहाते, गजानन पेटकर, ऐजाज फारुकी, मुकीम शेख, स्वप्नील खंडारे, चंदन महत्त्वाने, नाना परटक्के, आशीष गायकवाड, निखिल लोहवे, प्रदीप मुनघाटे, अशोक ठाकूर, प्रविण बोबडे, विशाल सोमवंशी, बाळकृष्ण भोयर, मनिष मानकर, सुजीत भोसले, जगदीश गौतम आदींनी केली.
१२ धार्मिक स्थळांवर चालला जेसीबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:33 PM
स्थानिक न.प.च्यावतीने विशेष मोहीम हाती घेवून शहर विकासाच्या कामात अडथळा निर्माण होणारे धार्मिक स्थळे हटविण्याचे काम केले जात आहे. सदर मोहिमेच्या चौथ्या दिवशी न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागातील १२ धार्मिक स्थळे हटविली.
ठळक मुद्देन.प.ची कारवाई : आतापर्यंत ६३ धार्मिक स्थळे केली जमिनदोस्त