लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : भरधाव जीपने कारला धडक दिली. यात दोन जण ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात येथील राष्ट्रीय महामार्गावर शेडगाव चौरस्ता परिसरात सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास झाला.प्राप्त माहितीनुसार, सुधीर रामकृष्ण पाटील हे व त्यांचे कुटुंबिय एम. एच. २० ए. जी. ८५०० क्रमांकाच्या कारने रक्षाबंधनाचे औचित्य साधून नागपूर येथे गेले होते. कानकाटी येथील अनिल ढेपे यांच्याकडील पाहूनपणाचा मानपान आटोपून त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. कार शेडगाव चौरस्त्या परिसरात आली असता समोरून येणाऱ्या एम.एच. ४९ ए. ई. ९२६४ क्रमांकाच्या जीपने कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त कार धडकेनंतर सुमारे पाच फुट हवेत उडाली होती. या अपघातात नक्ष नरेंद्र मानकर (१) रा. कांढळी हा जागीच ठार झाला. तर अश्विनी मानकर (३२) रा. कानकाटी, पवित्रा पाटील (३५), सुधीर पाटील (४०), महानंदा ढाले (६२), आर्यन प्रमोद थुल (६), छाया प्रमोद थूल (३८) सर्व रा. वर्धा हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत कऱ्हाडे, गजानन राऊत, कांचन नव्हाते, किशोर लभाने, प्राविण बांगडे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना मिळेल त्या वाहनाने सेवाग्राम येथील रुग्णालयाकडे रवाना केले. तेथे तपासणीअंती छाया प्रमोद थुल यांना वैद्यकीय अधिकाºयांनी मृत घोषित कले. या घटनेची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात नामदेव चाफले, धनंजय पांडे, वीरेंद्र कांबळे, अजय घुसे करीत आहेत.भरधाव कार चढली गावदर्शक दगडावरतळेगाव (श्या.पं.) : भरधाव कार दुचाकीला धडक देत गावदर्शक दगडावर चढली. यात तीन जण जखमी झाले. ही घटना सोमवारी नागपूर-अमरावती मार्गावरील खडका फाटा परिसरात घडली. नागपूर येथून अकोल्याच्या दिशेने जात असलेल्या एम.एच. ३० ए.एफ. ६८०७ क्रमांकाच्या कारने दुचाकीला धडक दिली. याच वेळी सदर कार अनियंत्रित होत गावदर्शक दगडावर चढली. या अपघातात दुचाकीचालक तसेच शरद सावजी आणि शरद यांच्या पत्नी जखमी झाल्या. शिवाय कारचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची तळेगाव पोलिसांनी नोंद घेतली आहे.
जीपची कारला धडक; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:38 PM
भरधाव जीपने कारला धडक दिली. यात दोन जण ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात येथील राष्ट्रीय महामार्गावर शेडगाव चौरस्ता परिसरात सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास झाला.
ठळक मुद्देचार गंभीर : शेडगावातील घटना