लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुलूपबंद असलेल्या मंदिरांना टार्गेट करून मंदिरातील मूर्तीच्या अंगावरील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चोरीचे मौल्यवान साहित्य जप्त केले आहे. शिवाय, चोरट्याने एकूण चार गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.वर्धा शहरातील सेवाग्राम मार्गावरील एका मंदिरातील मूर्तीवरील दागिणे व इतर मौल्यवान साहित्य चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला गती दिली. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी देवा जगनाथ टाक रा. आदिलाबाद याला ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान त्याने एकूण चार गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. शिवाय त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार योगेश पारधी यांच्या निर्देशावरून शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाचे एएसआय विवेक लोणकर, रितेश गुजर, पवन निलेकर, सचिन दीक्षित, अरविंद घुगे यांनी केली.तेलंगणातही चोरी केल्याची कबुलीअट्टल चोरटा असलेल्या देवा जगनाथ टाक याने एकूण चार मंदिरात चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. इतकेच नव्हे, तर तेलंगणा राज्यातही चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. असे असले तरी सदर आरोपीकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यासाठी शहर पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती.
देवाचे दागिने चोरणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 10:18 PM
कुलूपबंद असलेल्या मंदिरांना टार्गेट करून मंदिरातील मूर्तीच्या अंगावरील दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चोरीचे मौल्यवान साहित्य जप्त केले आहे. शिवाय, चोरट्याने एकूण चार गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
ठळक मुद्देमौल्यवान साहित्य जप्त : चार गुन्ह्यांची कबुली