लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील येनोरा मार्गावरील जलाराम जिनिंग युनिटला रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास आग लागली. यात कापसाच्या सुमारे ४०० गाठी जळाल्या. यातील नुकसानीचा अंदाज घेतला जात असून अद्याप आगीचे कारण कळू शकले नाही.कापसाच्या गाठी तयार करण्याच्या मशीनच्या युनिटला ही आग लागली. आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले. यावेळी जिनिंग परिसरातील ४०० कापूस गाठी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. हिंगणघाट पालिकेच्या अग्निशामक दलाने महत् प्रयासाने आगीवर नियंत्रण मिळविले. या कंपनीच्या आवारात ठेवलेल्या अन्य १००० कापूस गाठी अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे बचावल्या. आगीची तीव्रता पाहता पुलगाव, वर्धा येथून अग्निशामक दल बोलविण्यात आले. या जिनिंग फॅक्ट्रीला लागून अनेक दालमिल व जिनिंग कंपन्या असल्याने ही आग पसरण्याची शक्यता होती; पण बऱ्याच परिश्रमानंतर या आगीवर रविवारी दुपारी ताबा मिळविता आल्याने अनर्थ टळला. ही कंपनी येथील राकेश चंदारामा यांच्या मालकीची असून पूढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.
जिनिंगला आग; कापसाच्या ४०० गाठी भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:25 PM
येथील येनोरा मार्गावरील जलाराम जिनिंग युनिटला रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास आग लागली. यात कापसाच्या सुमारे ४०० गाठी जळाल्या. यातील नुकसानीचा अंदाज घेतला जात असून अद्याप आगीचे कारण कळू शकले नाही.
ठळक मुद्देपहाटेची घटना : आगीचे कारण अज्ञात