रमेशचंद्र दहीवडे : सिटूचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशनवर्धा : केंद्र व राज्य शासन कामगारांकरिता राज्यघटनेने दिलेले मौलिक अधिकार सरकारधार्जीन्या उद्योगपतींच्या हितासाठी बदलवित असून कामगारांना राज्यघटनेने दिलेले संरक्षण काढून घेत आहे. रात्रपाळीत महिलांना कामाची सक्ती करणे, कंत्राटी कामगारांना आठ तासाऐवजी १२ तास राबवून घेणे, किमान वेतन कायदा रद्द करणे, त्यचा अंमल न करणे ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत. त्यामुळे संघर्ष व संघटन मजबूत केल्याशिवाय न्याय मिळणार नाही असे प्रतिपादन चंद्रपूर येथील प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केले.सिटूचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन नामदेव मठ, वर्धा येथे घेण्यात आले. याप्रसंगी उद्घाटनपर मार्गदर्शनात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर सिटूचे राज्य सचिव अमृत मेश्राम, नागपूर, बाबाराव मून, चंद्रपूर, यशवंत झाडे, सिताराम लोहकरे, महेश दुबे, भैय्या देशकर, रंजना सावरकर, कल्पना चहांदे, रामभाऊ ठावरी, नरेंद्र कांबळे, माला खडसे उपस्थिती होते.प्रा. दहीवडे म्हणाले, देशभर सुशिक्षित बेरोजारांची संख्या वाढत आहे. तुलनेत नोकरीच्या संधी कमी होत आहे. शासनाने नोकर भरतीवर निधीच्या अभावी अघोषित बंदी घातली, मात्र त्याचवेळी आमदारांचे वेतन दरमहा ७० हजारांहून १ लाख ४० हजार रूपये केले. पेन्शन दरमहा ५० हजार केली. यासाठी पैसा शासकीय तिजोरीत कुठून आला? कंत्राटी कामगारांना विविध उद्योगात अत्यंत अल्प वेतनात राबवून घेवून उद्योगपती त्यांचे आर्थिक शोषण करतात. सरकार स्वत: अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना दरमहा ५ हजार मानधन देवून त्यांचे आर्थिक शोषणच करते. सर्वत्र हीच स्थिती आहे. अशा स्थितीत न्यायासाठी कष्टकरी कामगारांनी संघर्ष करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राज्य व केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण हाणून पाडा, महिलांवरील अत्याचारांना पायबंद घाला, शेतकऱ्यांना स्वामीनाथन कमीशनप्रमाणे हमी दर देवून कर्जमुक्त करा, असे ठरा महेश दुबे, यशवंत झाडे, गुंफा कटारे यांनी मांडले.आगामी तीन वर्षासाठी नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी रंजना सावरकर, सचिवपदी भैय्याजी देशकर, उपाध्यक्ष यशवंत झाडे, महेश दुबे, विनोद तडस, वैशाली खंडार, नरेंद्र कांबळे, सिताराम लोहकरे, रामभाऊ ठावरी, अर्चना मोकाशी, कल्पना चहांदे, गुंफा कटारे, कोषाध्यक्ष सुनिल घिमे, सदस्य अशोक नागतोडे, पांडुरंग राऊत, जानराव नागमोते, प्रभाकर हावरे, कमलाकर मरघडे, रमेश शेळके, रामेश्वर कुनघटकर, संदीप मोरे, संगीता जगताप, निर्मला चौधरी, विणा येसनकर, संगीता कोहळे, छाया बुरबुरे, प्रतिभा वानखेडे, शुभांगी कलोडे, अनिता राऊत, संगीता मरसकोल्हे, शीला पानकावसे, प्रतीभा राऊत, शिला बोरकुटे, माला खडसे, रंजना रंगारी, निमंत्रित संध्या संभे, अनिल निमजे, रवी भलमे, महादेव मोहिते, चंदाबाई सराम यांचा समावेश आहे.(शहर प्रतिनिधी)
संघर्ष व संघटनाशिवाय न्याय मिळत नाही
By admin | Published: September 24, 2016 2:17 AM