शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

महापुरूषांच्या विचारांमुळेच न्याय मिळतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 9:45 PM

फुले-शाहू- आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधूता ही बुद्धतत्वज्ञानातील मूल्ये अंगिकारून शोषणविरहीत समाजव्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले.

ठळक मुद्देसुरेश बोरकर : ‘भारतीय संविधान आणि प्रसारमाध्यमांची बदलती भूमिका’ यावर व्याख्यान

आॅनलाईन लोकमतवर्धा : फुले-शाहू- आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधूता ही बुद्धतत्वज्ञानातील मूल्ये अंगिकारून शोषणविरहीत समाजव्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्याच महामानवाचे विचार जर शासनकर्ते, प्रशासन, व्यवस्थापन, न्यायाधिश, भांडवलदार इत्यादींच्या डोक्यात असेल तर कोणत्याही अन्यायग्रस्त व्यक्ती किंवा समूह न्यायापासून वंचित राहणार नाही असे मत सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते तथा माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बोरकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर समविचारी संघटना यांच्या विद्यमाने अनेकांत स्वाध्याय मंदिरात आयोजित ४२ व्या अभ्यास वर्गात ‘भारतीय संविधान आणि प्रसारमाध्यमांची बदलती भूमिका’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव गुल्हाणे, राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, संचालक अरूण चवडे, संस्थापक जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे म्हणाले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीतेकडे बघितले जाते. विचार, लेखन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करीत असताना आपल्या संविधानिक कर्तव्याचा विसर न पडता घडलेल्या घटनांची सत्यता जनतेसमोर येणे गरजेचे आहे. परंतु आज काही चॅनल्स सत्ताधिशांच्या भांडवलशाहीच्या दावणीला बांधून सत्य लपवण्याचा प्रयत्न करतात हे कोरेगाव भिमाच्या घटनेवरून दिसून आले. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी जनतेचे रक्षक म्हणूनच भूमिका जपली पाहिजे असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. भास्कर नेवारे यांनी केले. प्रास्ताविक सुनील ढाले यांनी केले तर उपस्थितांचे आभार अभिनव हिवंज यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अ‍ॅड. पूजा जाधव, किशोर जगताप, सुनील सावधे, भिमसेन गोटे, प्रा. दत्तानंद इंगोले, मिरा इंगोले, दिवाकर शंभरकर, रा.सु. भोपळे, पदमाकर पोथारे, विकास दांडगे, अनिव मुर्डीव सुधाकर मिसाळ, राजेंद्र ढोबळे आदींनी सहकार्य केले. नागरिकांची कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थिती होती.