घोडायात्रा विशेष आकर्षण : आर्वीतील प्राचीन रामदेवबाबा मंदिराची आकर्षक सजावटआर्वी : येथील कसबा रामदेवबाबा मंदिरात मंगळवारी रामदेवबाबांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराची आकर्षक सजावट आणि रात्री विविध झाकींद्वारे रामदेवबाबांनी घोडायात्रा काढण्यात आली. ३ सप्टेंबरपासून सदर उत्सवास प्रारंभ झाला. बाबांच्या पादुकांचा अभिषेक आणि ५६ भोगाचा प्रसाद अर्पण उत्सवास सुरुवात करण्यात आली. दहा दिवस चालेलेल्या या उत्सवात बाबाची भजने रामदेव बाबा दुर्गा उत्सव भजन मंडळाद्वारे सादर करण्यात आली. मंगळवारी रामदेव बाबांची घोडायात्रा मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. ठिकठिकाणी रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. रथाची पूजा, आरती, प्रदक्षिणा करून जिवंत घोड्यांची पूजा केली जाते. रथामध्ये चांदीच्या सिंहासनात पादुका विराजमान करून त्या सिंहासनाला पुजारी आपल्या डोक्यावर घेऊन सिंहासनाला रथात विराजमान करण्याची प्रथा आहे. रथासोबत डालीबाईची समाधी, दोन मोठ्या कापडी घोड्याची झाकी, अब्दागिरी झेंडे, धुप गाडी, व ढोलताशासह रथयात्रा मंगळवारी काढण्यात आली. रथ यात्रेत भाविकांची गर्दी झाली होती. संपूर्ण श्हरातून ही मिरवणूक काढण्यात आली. यशस्वीतेकरिता सर्व भक्तगण आणि नागरिकांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)
कसबा रामदेवबाबा देवस्थानात जन्मोत्सव उत्साहात
By admin | Published: September 15, 2016 1:06 AM