लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद बिटातील सुरेश कोरचे यांच्या शेतात बोर व्याघ्र प्रकल्पातील बहुपरिचित कॅटरिना नामक वाघिण बेशुद्धावस्थेत आढुळन आली. ही माहिती गावभर होताच गावकºयांनी शेताकडे धाव घेतली. वेळीच वनविभागाची चमू घटनास्थळी दखल झाली. त्यांच्याकडून वाघिणीचा शोध सुरू झाला. यात तिला जाग आल्यानंतर ती जंगलाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती वनविभागाने दिली.शुक्रवारी सकाळी बोर व्याघ्र प्रकल्पातील कॅटरीना नामक वाघीण शेतात बेशुद्ध असल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एस. ताल्हण, क्षेत्र सहायक दिनकर पाटील व चमुकडून कॅटरिनाचा शोध घेणे सुरू केले. येथे नेमके काय घडले याचा शोध त्यांच्याकडून घेणे सुरू आहे. यावेळी फटाके फोडून तिला जागे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी ताल्हण यांना विचारणा केली असता ती झोपली असावी अशी शक्यता असून क्षेत्र निश्चित करण्याकरिता व विस्तार करण्याकरिता या भागात आली असावी असे ते म्हणाले. वृत्त लिहिस्तोवर कॅटरिनाला झाले तरी काय? या प्रश्नाचे उत्तर मिळू शकले नाही. ती वाघिण त्याच शेतात परत आल्याने ग्रामस्थांनी तेथे जाऊ नये असे वनविभागाने सांगितले.बछड्यांना सोडल्याने जागेचा विस्तारकॅटरीना बोर व्याघ्र प्रकल्पात तिच्या तीन बछड्यांसह वास्तव्यास होती. तिचे तीनही बछडे आता मोठे झाल्याने ती त्यांच्यापासून वेगळी झाली. बछडे असलेल्या क्षेत्रात आपला दुसरा सुबा निर्माण करण्यासाठी तिने या भागात प्रवेश केला असावा असे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले. शेतात झोपून असताना शेतकºयांनी तिला पाहिले असून जाग येताच ती जंगलाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
‘कॅटरिना’ वाघिण बेशुद्धावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:16 PM
खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद बिटातील सुरेश कोरचे यांच्या शेतात बोर व्याघ्र प्रकल्पातील बहुपरिचित कॅटरिना नामक वाघिण बेशुद्धावस्थेत आढुळन आली.
ठळक मुद्देवनविभागाची झोप उडाली : जाग येताच जंगलाकडे रवाना