लोकमत न्यूज नेटवर्कमांडगाव : समुद्रपूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या मांडगाव ते बोरगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर चिंचोली, बोरगाव, कोपरा, बोरखेडी आदी गावे असून आवागमन करताना गावकरी, शेतकरी तसेच वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.या मार्गाने दिवसरात्र वर्दळ सुरू असते. अशात रात्रीच्यावेळी या रस्त्याने प्रवास करताना खड्डे नजरेस पडत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. सदर रस्ता मांडगाव गावाला जोडणारा मुख्य रस्ता आहे. सद्यस्थितीत हा रस्ता अंतिम घटका मोजत असल्यकहे दिसते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. शिवाय डांबर निघाले असून मुरूम बाहेर पडले आहे. याकडे सबंधीत प्रशासनाने लक्ष देत दुरुस्ती करण्याची गावकºयांची मागणी आहे.या मार्गावर कुठलीही अनुचित घटना घडण्यापूर्वी तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्याची गरज गावकºयांतून व्यक्त होत आहे.जडवाहतुकीने रस्त्याची दैनाया रस्त्याने रेतीचे ट्रक, वीटभट्ट्यांसाठी माती घेऊन जाणारे वाहने व अन्य जडवाहनाची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे रस्त्याची अधिकच दैना होत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करुन गतिरोधक लावण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे. विद्यार्थी व शेतकºयांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. भरधाव वाहनांच्या गतीला आवर घालणे गरजेचे आहे.
मांडगाव-बोरगाव रस्त्यावर खड्डाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:15 PM
समुद्रपूर तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या मांडगाव ते बोरगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
ठळक मुद्देअपघाताचा धोका : डागडुजीची मागणी