सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे खरीप हंगामाकरिता आतापावेतो १ हजार ४३६ शेतकऱ्यांना १९ कोटी २० लाख २५ हजार म्हणजे केवळ २ टक्केच कर्जवाटप होऊ शकले. मात्र, जूनमध्ये कर्जवाटपाची टक्केवारी २० टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज जिल्हा अग्रणी बँकेने व्यक्त केला आहे.जिल्ह्यातील बँकांना रब्बी हंगामाकरिता १०३ कोटी ९७ लाख तर खरिपाकरिता ९२४ कोटी ९९ लाख असे एकूण १ हजार कोटी ९६ लाख उद्दिष्ट होते. राहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला असून खरिप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात ४ लाख २८ हजार ६१५ हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून शेतमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. यंदा संपूर्ण जगात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले. त्यामुळे देशभरासह राज्यात २२ मार्चपासून चार टप्प्यात १७ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. या काळात बाजारपेठ आणि सर्वच व्यवहार ठप्प होते. या काळात बँकांचे कामकाजही सकाळी ८ ते १ या वेळात सुरू होते. ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावातील शाखेवरच अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधनेही ठप्प होती. प्रशासनाने नागरिकांना घरातच रहा, सुरक्षित रहा असे आवाहन केल्याने शेतकऱ्यांसह सर्वच घरात लॉकडाऊन होते. कोरोना संक्रमणाच्या धसक्याने या काळात बँकांतील व्यवहारावरही मोठा परिणाम झाला. जिल्ह्यातील १ हजार ४३६ सभासद शेतकºयांना विविध बँकांमार्फत १९ कोटी २० लाख २५ हजारांचे कर्ज वितरण झाले. म्हणजे आतापावेतो केवळ २ टक्केच कर्जवाटप झाले. त्यामुळे यावेळी बँका कर्जवाटपाचे उद्दिष्ट निम्मेही गाठू शकणार नाही, अशी सध्या तरी परिस्थिती आहे.‘बीओआय’कडून सर्वाधिक कर्जवितरणबँक ऑफ इंडियाकडून सर्वाधिक ५०४ शेतकरी सभासदांना ४०१.०९ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले. तर विस्ताराने मोठ्या असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून केवळ १२ शेतकऱ्यांना १२ कोटी ९९ लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे.बॅँकनिहाय शेतकऱ्यांना कर्जवाटपबॅँक सभासद रक्कम (कोटी रूपयांत)अॅक्सिस बॅँक ४४ १.४४बॅँक ऑफ बडोदा २२ ५७.८८बॅँक ऑफ इंडिया ५०४ ४०१.०९बॅँक ऑफ महाराष्ट्र १३५ २५३.८८कॅनरा बॅँक ११ ९.३०सेंट्रल बॅँक ऑफ इंडिया १०२ ८६.४४कॉर्पोरेशन बॅँक १५ २२.००एचडीएफसी बॅँक २१३ ५१८.००आयसीआयसीआय ४८ १००.०आयडीबीआय ०६ ८.४०पंजाब नॅशनल बॅँक २०५ १६७.४१स्टेट बॅँक ऑफ इंडिया १२ १२.९९सिंडिकेट ०२ २.४८युको बॅँक २० १४.२९रुरल बॅँक ७३ ८.६४विजया बॅँक २४ ३३.६५एकूण १,४३६ १९२०.२५
खरिपातील कर्जवाटप केवळ दोन टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 5:00 AM
जिल्ह्यातील बँकांना रब्बी हंगामाकरिता १०३ कोटी ९७ लाख तर खरिपाकरिता ९२४ कोटी ९९ लाख असे एकूण १ हजार कोटी ९६ लाख उद्दिष्ट होते. राहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला असून खरिप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात ४ लाख २८ हजार ६१५ हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून शेतमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. शेतकरी बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत.
ठळक मुद्देलॉकडाऊन इफेक्ट : कर्जाची टक्केवारी वाढण्याची शक्यता