लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील डोरली शेत शिवारात लक्ष्मी खिरडकर आणि महादेव खिरडकर यांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना २४ डिसेंबरला उघडकीस आली. तेव्हापासून या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी सेलू व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस प्रयत्न करीत होते. अखेर या हत्याकांडाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून संशयीवृत्तीतूनच आरोपीने लक्ष्मी आणि महादेव याची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. नीलेश महादेव तडस (३४) रा. घोराड, असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.प्राप्त माहितीनुसार, सेलू तालुक्यातील डोरली शेत शिवारात शेतातच वास्तव्य करणाºया महादेव खिरडकर आणि लक्ष्मी खिरडकर या दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याची घटना २४ डिसेंबरला उघडकीस आली. याप्रकरणी गजानन महादेव खिरडकर (३२) रा. घोराड यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच सेलूसह स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने समांतर तपास सुरू करण्यात आला. याच तपासादरम्यान काहींना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्यात नीलेश तडस हाही होता. सुरूवातीला उडवा-उडवीचे उत्तरे देणारा नीलश पोलीस प्रसाद मिळाल्यानंतर बोलका झाला. आपल्या पत्नीशी महादेव खिरडकर याचे सूत जूळले आहे, असा समज करून त्याने महादेव खिरडकर याला संपविण्याचा कट रचला. शिवाय प्रत्यक्ष कृती करण्याच्या उद्देशाने तो खिरडकर यांच्या शेतात पोहोचला. शिवाय त्याने महादेव खिरडकर याला मारहाण करण्यास सुरूवात केली. हा प्रकार चणा पिकाला सिंचन करीत असलेल्या लक्ष्मीच्या निदर्शनास आला. तिने तातडीने महादेवला वाचविण्याचा प्रयत्न केला. अशातच आरोपीने लक्ष्मीच्या डोक्यावर जोरदार प्रकार करून तिलाही जिवानिशी ठार केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक सुनील गाडे, महेंद्र इंगळे, आशिष मोरखडे आदींनी केली.पत्नीसह मुलाला दिले होते विषआरोपी नीलेश तडस याचा प्रेमविवाह झाला आहे. असे असले तरी तो नेहमीच पत्नीच्या चारित्रावर संशय घेत होता. शिवाय त्याने यापूर्वी पत्नी आणि मुलाला विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, सदर प्रकार वेळीच लक्षात आल्याने त्यांचे प्राण वाचले होते, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.चार दिवस चालली विचारपूसचौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या नीलेश तडस हा सुरूवातीला उडवा-उडवीचे उत्तर देऊन पोलिसांची दिशाभूलच करीत होता. त्यानंतर पोलिसांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावून संशयीत आरोपीला बोलके केले. त्यानंतर सदर दुहेरी हत्याकांडाचे गुढ उलगडले.
संशयीवृत्तीतून खिरडकर दाम्पत्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 6:00 AM
प्राप्त माहितीनुसार, सेलू तालुक्यातील डोरली शेत शिवारात शेतातच वास्तव्य करणाºया महादेव खिरडकर आणि लक्ष्मी खिरडकर या दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याची घटना २४ डिसेंबरला उघडकीस आली. याप्रकरणी गजानन महादेव खिरडकर (३२) रा. घोराड यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देरहस्य उलगडले : वाचविण्यासाठी गेलेल्या लक्ष्मीलाही संपविले