लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उन्हाळा सुरू होताच पाणीदार व इतर फळांची मागणी प्रचंड वाढली असतानाच हृदयरोगावर गुणकारी असलेले किवी फळ नागरिकांना भुरळ घालत आहे. या फयाचीही नित्याने मागणी होत आहे.सध्या फळांचा राजा आंब्याचा हंगाम सुरू आहे. याशिवाय बाजारपेठे टरबूज, खरबूज, परप्रांतातील पेरू, सफरचंद, अननस, पपई, द्राक्षे विक्रीआठी उपलब्ध आहे. या फळांची शहरातील फळबाजारात दररोज आवक होत आहे.चिकूप्रमाणे रंग असलेले किवी फळ न्यूझीलंड येथील आहे. हे फळ आरोग्यदारी असल्याने याची मागील काही दिवसांपासून प्रचंड मागणी वाढली आहे. महागडे असले तरी याची मागणी होताना दिसू येत आहे. वर्ध्याच्या बाजारपेठेत नागपूर येथील कळमना मार्केट व अन्य राज्यांतून फळाची आवक होते. गोलबाजार परिसरात सर्वच फळांची विक्री केली जाते.
न्यूझीलंडचे किवी घालतेय भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 10:35 PM
उन्हाळा सुरू होताच पाणीदार व इतर फळांची मागणी प्रचंड वाढली असतानाच हृदयरोगावर गुणकारी असलेले किवी फळ नागरिकांना भुरळ घालत आहे. या फयाचीही नित्याने मागणी होत आहे.
ठळक मुद्देहृदयरोगावर गुणकारी : नागरिकांकडून मागणी